Ticker

6/recent/ticker-posts

गौतम नगरमध्ये 4 मुलांवर कुत्र्यांचा हल्ला, ग्रामीण रुग्णालयात रेबीजची लसच गायब


भद्रावतीत कुत्र्यांचं राज्य, माणसांचा जीव धोक्यात! 4 चिमुकल्यांना रक्तबंबाळ केलं, पण रुग्णालयात लस नाही... 'मरा' म्हणायचं का?


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : भद्रावतीकरांनो, घराबाहेर पडताना जपून! कारण इथे आता माणसांपेक्षा मोकाट कुत्र्यांचंच राज्य आलंय. 25 तारखेला गौतम नगरमध्ये 4 निष्पाप चिमुकल्यांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी रक्तबंबाळ केलं. अंगावर चाव्याच्या खुणा, आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी... आणि यावर कडी म्हणजे...रुग्णालयात गेल्यावर 'रेफर'चा फतवा!
रडत-ओरडत पोरांना घेऊन ग्रामीण रुग्णालयात पोहोचलेल्या पालकांना डॉक्टरांनी सांगितलं, "इथे रेबीजची लसच नाही, चंद्रपूरला घेऊन जा!" विचार करा... चावा घेतलेला लेकरू वेदनेनं विव्हळतोय आणि प्रशासन म्हणतं 'लस नाही'! मग गरीब माणसाने करायचं काय? लेकराला मरू द्यायचं का?

शहरात मोकाट कुत्रे पकडणारी यंत्रणा झोपलीआहे का? ग्रामीण रुग्णालयात रेबीजची लस न ठेवण्याचा ठेका घेतला आहे का? एखाद्या लेकराचा जीव गेल्यावरच प्रशासन जागं होणार का?  लहान मुलांच्या जीवापेक्षा तुमची खुर्ची मोठी आहे का? लस आणायला किती वर्ष लागतात? मोकाट कुत्रे मोकाट फिरतात आणि नागरिक घरात कैद... हे चालणार नाही!" असा संतातजनक  सवालांचा भडिमार  नागरीक करत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक नरेंद्र पढाल, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार,नगरसेवक महेश जीवतोडे,उषा जाधव यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी या़ची भेट घेऊन निवेदन दिले.

मोकाट कुत्र्या़चा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोना करावी, भद्रावती ग्रामीण रुग्णालयात रेबीज व तत्सम औषधी तात्काळ उपलब्ध करावी़,नागरीकांच्या जीवाशी खेळ थांबवावा. असे या निवेदनातून नगर परिषद    प्रशासनाला दिले आहे.

भद्रावतीकर आता पेटून उठलेत... प्रशासनाच्या उत्तराची प्रतीक्षा!

---------------------- बॉक्स-------------------
भद्रावतीत मोकाट कुत्र्यांचा हैदोस 4 मुलांना चावा,पण ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसच नाही! जिल्ह्यात रेफर करण्याचा सल्ला. संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना निवेदन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या