जय भवानी नगर सिल्लोड येथे रात्री दोन ते अडीच्या दरम्यान घडली घटना
सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिली तक्रार
____________________
चित्रा न्युज प्रतिनिधी
सिल्लोड::- शहरातील जय भवानी नगर येथून दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या मुलाच्या नावे असलेली यमाहा या कंपनीची R-ONE- 5 MH20HL 2544 या क्रमांकाची मोटरसायकल दिनांक 19/05/2026 रोजी रात्री दोन ते अडीच सुमारास त्यांच्या राहत्या घरात समोरून गाडीचे लॉक तोडून चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून सकाळी त्यांची पत्नी अंगण झाडायला बाहेर आली तेव्हा त्यांच्या पत्नीच्या ही बाब लक्षात आली
गाडी चोरी झाल्याची बाब पतीला व मुलांना सांगितली तेव्हा दशरथ सुरडकर व मुलांनी इकडे तिकडे परिसरामध्ये गाडीचा शोध घेतला असता गाडी आढळून आली नाही तेव्हा सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गाडी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वरील क्रमांकाची मोटर सायकल कुणाला कुठे आढळल्यास तात्काळ 75 58 31 64 67 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान पत्रकार दशरथ सुरडकर यांनी केली आहे.
सध्या सिल्लोड शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून एक प्रकारची ही टोळी सक्री झाल्याची चर्चा शहरांमध्ये वेगाने पसरत आहे.
या चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसासमोर मोठे आव्हान उभे केल्याची चर्चा शहरात वेगाने पसरत आहे.
श्रीकृष्ण नगर व विविध भागात मोटरसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्याची सुद्धा नागरिक सांगत आहे पोलिसांनी तात्काळ अशा शहरात फिरणाऱ्या दिवसा व रात्री लक्ष ठेवून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सर्व सिल्लोड शहर सिल्लोड ग्रामीण अजिंठा वडोद बाजार फर्दापुर, सोयगांव व जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला याबाबत माहिती देऊन नाकेबंदी सुद्धा केल्याचे सांगितले.
याबाबत सिल्लोड शहर पोलीस ठाणे अंमलदार प्रवीण गायकवाड यांनी सदर तक्रारीची नोंद घेऊन पुढील तपास करत असल्याचे सांगितले.


0 टिप्पण्या