Ticker

6/recent/ticker-posts

मक्का शेतात आग ; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली : शहरातील लाखांदूर रोडवर एका शेतात अचानक लागलेली आग विझविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ( मंगळ. १९ मे ) रोजी स. १०:२५ ला घडली. येथे परीसरातील जनतेत त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी व आग विझवायला प्रचंड धावपळ सुरू झाली होती. पण आगीच्या तावडीत सापडलेल्या शेतकऱ्यास बाहेर काढण्यासाठी केलेले जनतेचे प्रयत्न असफल ठरले. ही लागलेली प्रचंड आग विझविण्यासाठी नगरपरिषद अग्निशमन दलाला पाचारण केले होते. तातडीने साकोली पोलीस घटनास्थळी दाखल होत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  मंगळवार ता. १९ ला सकाळी १०.२५ दरम्यान रामदास गोखलू निंबेकर वय ६५, रा. तलाव वार्ड साकोली हे त्यांचे शेतातील मक्का पिकांना लागलेली आग विझविण्यास गेले असता, शेतात लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू  झाला. परीसरात लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि आगीच्या आगडोंबात त्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी एकच धावपळ उडाली. तेथे माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी तातडीने नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले होते. ही आग कशाने लागली याचे कारण अद्यापही समजले नाही. ही माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी येत   शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणूध अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साळवे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या