चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे विभाग वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत साकोली येथील "हायटेक" जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ ( सेमी इंग्लिश ) मधील दोन विद्यार्थी पात्र ठरले. त्यांचे शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने ( बुध. २० मे ) ला निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देत गौरव करण्यात आला. जि. प. केंद्र उच्च प्राथ. शाळा साकोली क्र. १ येथील वर्ग ५ वी चा स्वप्नील सचिन लांजेवार व टिशा गिरीधारी कापगते हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. यशस्वी वियार्थ्यांचे अधिक मनोबल वाढावे यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती वतीने दोघांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत भारद्वाज, मुख्याध्यापक सेवकराम हटवार, सदस्य आशिष चेडगे, शिक्षकवृंद ज्ञानेश्वर माहूरे, शालिनी राऊत, टी. आय. पटले, चित्ररेखा इंगळे, सुनिता गहाणे, पद. शिक्षक चेतन बोरकर, श्रद्धा गवळी, आरती कापगते हे उपस्थित होते.


0 टिप्पण्या