चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :- दि. २७ मे २०२६ रोजी लोकायत बहुउद्देशीय संस्था, भोजापूर यांच्या वतीने नेहरू नगर, भोजापूर येथे त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र तिरपुडे यांच्या हस्ते नऊ कोटींची माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक बौद्ध वंदना ग्रहण करून दीन-दुबळ्यांची माता रमाई यांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी वक्त्यांनी “त्याग, समर्पण आणि संघर्ष यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे रमाबाई” असे विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार असले, तरी त्यांच्या जीवनाच्या घडणीत रमाबाई यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष योगेश मेश्राम, सेवानिवृत्त प्राचार्य नरेंद्र गणविर, प्रा. डॉ. विजय गणविर, आर्ट अँड कॉमर्स महाविद्यालय पेट्रोलपंप (ठाणा) येथील प्राध्यापक, देवेंद्र धारगावे, वर्षा गणविर, राहुल रामटेके, सौरभ मेश्राम, संकेत मेश्राम, अंकिता मेश्राम, उर्वशी मेश्राम, सिद्धांत मेश्राम यांच्यासह नेहरू नगर, भोजापूर येथील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र गणविर यांनी केले.


0 टिप्पण्या