Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक घटना; महाराष्ट्र सुरक्षा सेनेतील विजय काळे याचा नदीत बुडून करुण अंत,

पाटाळा -  राळेगाव येथील घटना - माजरी परिसरात शोककळा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : एक हसता-खेळता जवान काळाने हिरावून नेला... भद्रावती तालुक्यातील पाटाळ-राळेगाव येथील रिठ नदी पात्रात पोहताना महाराष्ट्र सुरक्षा सेनेत कार्यरत असलेल्या जवानाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे. 

विजय ओंकार काळे (वय 30) रा. दहेगाव, ता. यावल, जि. जळगाव. हल्ली मुक्काम विनायक नगर, माजरी.अशी मृतजवानाची ओळख आहे.

मंगळवारी, 26 रोजी दुपारी विजय काळे आपल्या मित्रांसोबत पाटाळा रिठ नदी पात्रावर गेला होता. विजय हा नेहमीच या नदी पात्रात पोहण्यासाठी जात असल्याने त्याला नदीची माहिती होती.

नदीतील एका धडीवरून दुसऱ्या धडीकडे त्याचे मित्र पोहत गेले. त्यानंतर विजय काळे हाही त्यांच्या मागून पोहत दुसऱ्या धडीकडे जात होता. आणि त्याचवेळी काळाने घाला घातला...

पोहत असताना अचानक विजय खोल पाण्यात जाऊ लागला. मित्रांच्या डोळ्यादेखत तो बुडत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी जीवाच्या आकांताने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याची खोली अधिक असल्याने आणि तो खोल भागात गेल्याने मित्रांच्या हातातून तो निसटला. काही क्षणातच तो पाण्यात बेपत्ता झाला. आणि क्षणात होत्याच नव्हतं झालं

घटनेची माहिती मिळताच माजरी पोलीस स्टेशनला कळवण्यात आले. रात्र उशीर झाल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. बुधवारी, 27 रोजी पहाटेच्या सुमारास विजय काळे याचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना आढळून आला. 

महाराष्ट्र सुरक्षा सेनेतील जवानाच्या अशा अकाली जाण्याने माजरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

-------------------------------------
अत्यंत दु:खद रिठ नदीने हिरावला महाराष्ट्र सुरक्षा सेनेतील जवान!* *पाटाळ-राळेगाव येथे मित्रांसोबत पोहायला गेलेला विजय काळे (30) खोल पाण्यात बुडाला. मित्रांनी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण काळापुढे कोणाचे चालले? रात्रभर शोधानंतर सकाळी मृतदेह सापडला. मूळ जळगावचा, पण माजरीत राहणारा विजय... भावपूर्ण श्रद्धांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या