Ticker

6/recent/ticker-posts

जांभळी सडक येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाची हिटलरशाही

 मंजुरी देऊ नये या अर्जाचीच अधिकाऱ्यांनी लावली वाट  

अधिकारी आणि कंत्राटदाराचा बेबंदशाही कारभार 

रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली: जांभळी / सडक वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या गिरोला  येथील अर्जदाराने स्वतःच्या मालकी जागेतील झाडे तोडण्याची परवानगी देऊ नये याकरिता अर्ज केलेला होता. मात्र अधिकारी यांनी कंत्रादार यांच्याशी साटेलोटे साधून अर्जदाराच्या अर्जाचीच वाट लावून झाडे कापली. त्यामुळे जांभळी / सडक येथील वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांची हिटलरशाही नव्याने समोर आलेली आहे. सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार युवराज रामदास पर्वते रा. गिरोला, तालुका साकोली यांनी गिरोला / जांभळी येथील सामायिक गट क्रमांक १६०  मधील ७० ते ७२ झाडे कापण्याची मंजुरी देऊ नये याकरिता फेब्रुवारी २०२४ मध्ये अर्ज सादर केलेला होता. एकीकडे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी शासन स्तरावर करोडो रुपये खर्च करून लक्षावधी झाडे लावली जातात जातात, जतन केली जातात. मात्र दुसरीकडे अर्जदारांनी अर्ज केला असतांना सुद्धा झाडे तोडण्याची मंजुरी देऊन हुकूमशाही पद्धतीने ही झाडे तोडण्याचा विक्रम जांभळी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या मार्फत केला. या प्रकरण संदर्भात सदर अधिकारी यांनी स्वतःचे हात ओले करून मंजुरी ( टीपी ) दिली असल्याचा आरोप अर्जदाराने केलेला आहे.
विशेष म्हणजे या गटातील झाडे तोडण्याची परवानगी देऊ नये याकरिता सदर अर्जदाराने  फेब्रुवारी २०२४ मध्ये अर्ज दाखल केला होता. त्यानंतरही १० व ११ मे २०२६ रोजी सदर झाडे कंत्राटदारा मार्फत तोडण्यात आली. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी कंत्राद्वारामार्फत किती मध्ये विकल्या गेले ? हा प्रश्न या निमित्ताने अर्जदार यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे याविषयी आरएफओ लाखनी, क्षेत्र सहाय्य अधिकारी जांभळी यांना १० मे २०२६ रोजी भ्रमणध्वनीवरून झाडे तोडत असल्याची माहितीसुद्धा अर्जदार यांनी दिलेली होती हे त्यातल्या त्यात विशेष. त्यानंतर  १४/५/२०२६ रोजी कंत्राट दराने झाडे तोडल्याची रीतसर तक्रार दिली होती. याही तक्रारीकडे  हेतूपरस्पर दुर्लक्ष करण्यात आले. 
अर्जदाराने जिल्हाधिकारी भंडारा यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी अर्जदार वनविभागद्वारे स्थापन केलेल्या गिरोला / जांभळी वन समितीचा अध्यक्ष आहे. याची माहिती कार्यरत असलेल्या फॉरेस्ट गार्ड लटपटे यांना आहे. यापूर्वी गावातील अनेक खसऱ्यांचे उभ्या झाडांचे पंचनामे करयेतांना अध्यक्ष यांना प्रत्यक्ष बोलावले जात होते. परंतु यावेळी मात्र हा पंचनामा करताना मला बोलविले गेले नाही. सातबारा गट क्रमांक १६० अतिरिक्त नोंदनुसार रामदास हा करता पुरुष आहे त्यांचे वारस युवराज रामदास पर्वते आणि नूपराज पर्वते हे आहेत. संबंधित घटना क्रमाची संपूर्ण माहिती क्षेत्र सहायक जांभळी साकोली व आरएफओ लाखनी यांना रीतसर तक्रारीद्वारे देण्यात आली. मात्र यावर अजतागत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. सदर कंत्राटदार एका गावात १० खसऱ्यांपैकी एका गटाची मंजुरी घेतो आणि सर्व गटातील झाडे कापून त्यात इतर झाडे मिसळून उचलून नेतो. हा मनमानीपणाचा धंदा सदर कंत्राटदार प्रत्येक गावात करीत असल्याची माहिती आता या निमित्ताने समोर येत आहे. या लाकूडतोड कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी अर्जदारांनी केलेली आहे. आपल्या विभागाकडून योग्य कार्य करून आम्हाला न्याय मिळेल अशी खात्रीपूर्वक अपेक्षा अर्जदाराने जिल्हाधिकारी तसेच उपवनसंरक्षक प्रादेशिक वन विभाग भंडारा सहाय्यक उपसंरक्षक प्रादेशिक उपनगर विभाग साकोली यांना दिलेल्या तक्रारीत केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या