Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती थोडक्यात बचावली! स्फोटकांच्या साठ्याजवळ भीषण आग, प्रशासनाच्या तत्परतेने महादुर्घटना टळली


आयुध निर्माणीच्या मॅगझीनलगत जंगल पेटलं; घोट, निंबाळा गावात खळबळ, आगीवर नियंत्रण पण कारण गुलदस्त्यात


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : आयुध निर्माणीच्या मॅगझीनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंगलात बुधवारी 28 मे 2026 रोजी दुपारी 11:30 वाजता भीषण आग लागली. स्फोटकांचा साठा जवळच असल्याने काही क्षणात मोठ्या स्फोटाची भीती निर्माण झाली होती. 

जंगलालगत घोट, निंबाळा, कचराळा, चपराळा ही गावे असून जनावरे चराईसाठी याच परिसरात येतात. आगीने रौद्र रूप धारण करताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

भद्रावती नगर परिषद, महानगरपालिका, अग्निशमन दल, वन विभाग आणि आयुध निर्माणी व्यवस्थापन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 
सुदैवाने कोणतिही जीवितहानी झाली नाही. एका मोठ्या दुर्घटनेला टाळण्यात प्रशासनाला यश आले. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.

-----------------------------------------------
 भद्रावती ब्रेकिंग _ आयुध निर्माणीच्या मॅगझीनजवळ जंगलात आग! 28 मे दुपारी 11:30 ची घटना. स्फोटाची भीती पण अग्निशमन दलाने वाचवले. जीवितहानी नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या