विक्रेत्याला सात जणांकडून बुक्क्या-बांबूने मारहाण, हल्ल्याचा व्हिडिओही बनवला
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : तालुक्यातील मांगली येथे अवैध दारू विक्रीच्या वादातून एका विक्रेत्यावर सात जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
मांगली परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. चार दिवसांपूर्वी एका अवैध दारू पुरवठादाराने संबंधित विक्रेत्याला "माझ्याकडूनच दारू घे, दुसऱ्याकडून खरेदी करू नको" अशी धमकी दिली होती.
बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास संबंधित अवैध दारू विक्रेता मांगली येथून पिर्लीकडे जात असताना एका कारमधून सात जण खाली उतरले. त्यांनी जुन्या वादाची आठवण करून देत त्याच्यावर हाताच्या बुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. आरोपींनी जीवे मारण्याची धमकीही दिली.
*धक्कादायक :* हल्ल्यादरम्यान काही आरोपींनी संपूर्ण घटनेचा मोबाईलवर व्हिडिओदेखील तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी धिरज वराठकर यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी आदित्य कांबळे, अक्षय मन्ने, सुरज मन्ने, पिंटू मरसकोल्हे, विक्की लाडूकर, समीर बोरकर, अमृत बावने यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118(1), 191(2), 191(3), 189(2), 189(4), 190, 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहेत.
-------------------------------------------
भद्रावतीच्या मांगलीत अवैध दारूच्या वर्चस्वावरून राडा! 'माझ्याकडूनच दारू घे' अशी धमकी देऊन सात जणांनी विक्रेत्याला गाठलं. सकाळी साडेआठ वाजता कारमधून उतरून बुक्क्यांनी, बांबूने मारहाण केली. धक्कादायक म्हणजे हल्ल्याचा व्हिडिओही बनवला! धिरज वराठकर यांच्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल. पोलिस तपास सुरू


0 टिप्पण्या