Ticker

6/recent/ticker-posts

आगग्रस्तांना भंडारा रेड क्रॉस जिल्हा शाखेच्या वतीने मदत साहित्य किट चे वाटप"

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा  :-सिव्हिल लाईन, भंडारा निवासी श्री संदीप कठोते यांचे शासकीय निवासस्थानी दिनांक. 21/5/2026 रोजी सकाळी 8:30 वा.घरगुती वापराचा सिलेंडर स्फोट झाल्यामुळे निवासस्थान जळून खाक झाले, त्यात जीवनावश्यक वस्तू, अन्न, दागिने व नगद रुपये यांचेसह शासकीय निवास स्थान पूर्णतः नुकसान   जळाल्याचे निदर्शनास आले.
           वनरक्षक म्हणून कार्यरत  श्री संदीप कठोते यांना पत्नी स्वरूपा कठोते,मुलगी साक्षी कठोते, मुलगा समीर कठोते यांचे समक्ष   भंडारा जिल्हा इंडियन  रेड क्रॉस सोसायटी मुख्यालयाचे वतीने तत्काळ *"मदत साहित्य किट वाटप"* सचिव डॉक्टर नितीन तुरसकर यांच्या हस्ते आगग्रस्त  परिवारास देण्यात आले. 
      याप्रसंगी सचिव डॉक्टर नितीन तुरसकर, कोषाध्यक्ष हेमंत चांदवसकर,रक्तरत्न प्रीतम कुमार  राजाभोज, रवीशंकर साकोरे, राजूभाऊ खवसकर इत्यादी रेड क्रॉस भंडाराचे पदाधिकारी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या