Ticker

6/recent/ticker-posts

पो.स्टे.वाढवणा येथे सोमवारी रक्तदान शिबीर

रक्तदात्यांना मिळणार मोफत "हेल्मेट" 

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतुन व डाॅ.भालचंद्र ब्लड सेंटर,लातुर आणि रोटरी क्लब आफ मिडटाऊन,लातुर तसेच पो.स्टे.वाढवणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ रोजी (सोमवार) पोलिस स्टेशन वाढवणा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी रोटरी कल्ब आॅफ मिडटाऊन, लातुर तर्फे रक्तदात्यांना एक 'हेल्मेट' अगदी मोफत देण्यात येणार आहे.
अलीकडच्या कांही दिवसात जिल्ह्यात झालेल्या रोडअपघातात बळी गेलेल्यांपैकी अनेकांचे बळी हेल्मेट नसल्याने गेले आहेत.म्हणुन तसेच रक्तांची ही कमतरता जाणवु लागली आहे.
म्हणुन या रक्तदानाची मुळ संकल्पना ही अमोल तांबे (जिल्हा पोलिस अधिक्षक) यांना सुचली आहे.म्हणुन रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून यात भाग घेणा-या रक्तदात्यांना एक 'हेल्मेट' मोफत देण्यात येणार आहे.तेंव्हा जास्तीत जास्त युवक व रक्तदात्यांनी रक्तदान सारखे श्रेष्ठदान करावे,असे आवाहन सपोनि.सुनील गायकवाड, पोउपनि.प्रवीण हालसे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या