पुराच्या भीतीने हाळी-हंडरगुळीकर दहशतीत!!
चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी (वा):-वनवासात असताना प्रभू श्रीरामाने ज्या नदीमध्ये स्नान केले होते ती नदी म्हणजे तिरु नदी!अशी एक अख्याईका आहे.आणि गत कित्येक वर्षा पासुन या नदीची झालेली दुरवस्था पाहता तसेच देशातील लहान-मोठ्या नद्यांवर आमची 'श्रध्दा' आहे.असे म्हणणा-या पंतप्रधान मोदींच्या राज्यात 'राम तेरी तिरु नदी मैली हो गई' असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असून आगामी पावसाळा तोंडावर आला असतानाही या नदीची स्वच्छता अद्यापही झाली नसल्याने स्वच्छता कागदावर का वा-यावर?या प्रश्नाचे उत्तर मागच्या दशकापासून कुणालाही सापडले नाही.म्हणुन दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही तिरु नदी काठच्या घरांना पुराचा धोका होणार!या भीतीने हाळी-हंडरगुळीकर आतापासुनच दहशतीत जगत आहेत.तेंव्हा आमची नद्यांवर प्रचंड श्रध्दा आहे,असे म्हणणारे 'नमो' तिरु नदीबाबत खरोखर श्रध्दा दाखवणार का?
कारण,या नदीच्या दुरवस्थेबाबत अनेकदा आवाज उठविला तरीही या नदीच्या स्वच्छता,
रुंदी व खोलीकरणाकडे गत दशकभरापासुन कुणीच लक्ष दिले नसल्याने प्रभू श्रीरामाने स्नान केलेली तिरुनदी भारतात आहे का पाकिस्तानात?
हा गहन सवाल अनेकांना सतावतोय.
आगामी पावसाळ्यापुर्वी या नदीची स्वच्छता,
रुंदी व खोलीकरणाचे कामे करणे गरजेचे आहे.
अन्यथा पावसाळ्यात एखादी दुर्दैवी घटना घडू शकते.
राजकीय व प्रशासकीय उदासीनता ठरणार हानीकारक!!
उदगीर तालुक्यात सर्वात मोठी तसेच पौराणिक म्हत्व असलेली नदी म्हणुन तिरुची ओळख आहे.
तसेच या नदीला अनेक उपनद्या,ओढे,नाले जोडलेले आहेत. माञ,सध्या या नदीसारखी बेकार अवस्था जिल्ह्यातील कोणत्या नदीची झाली नसेल.आज या नदीपाञात पाणी कमी आणि घाण, दुर्गंधीसह गाळ व पानवेलींचेच राज्य दिसुन येते.यामुळे शेजारच्या घरात पुराचे पाणी शिरते. माञ,आजवर मनुष्यहानी झाली नसली तरी आजवरची प्रशासकीय आणि राजकिय उदासीनता भविष्यात नक्कीच हानीकारक ठरु शकते. आणि मगच प्रशासनासह राजकारण्यांचे पण 'नयन' उघडू शकते.
या नदीत व पुलावर दारु विक्रेते,फळ विक्रेते वेस्टेज पाणी पाऊच,प्लॅस्टिक ग्लास,नासकी फळे या सारखे पदार्थ टाकत असल्याने परिसर घाण व दुर्गंधीने माखला आहे.तरीही याचे खापर विशिष्ट लोकांवरच का फोडले जाते?
वरील सर्व बाबींची माहिती असूनही संबंधित यंञणा गप्पगार का आहे?
अय्याज कुरेशी,अध्यक्ष कुरेशी समाज,हाळी..


0 टिप्पण्या