Ticker

6/recent/ticker-posts

माजी उपायुक्त शेषरावजी खाडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून सत्कार



चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे माजी सचिव, माजी उपायुक्त व जिल्हा विकास यंत्रणेचे माजी प्रकल्प संचालक आदरणीय श्री शेषरावजी खाडे साहेब यांचा अमृत महोत्सवी 75 वा वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या  .  शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 
  याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत आर आर लाहोटी सायन्स कॉलेज मोर्शीचे माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रीय सहसचिव श्री पुरुषोत्तम गावंडे, अमरावती जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष श्री दामोदर पवार कोषाध्यक्ष श्री धनराज निपाने, सचिव गजेंद्र पाथरे, लेखिका सौ छायाताई पाथरे, अशोका पार्क ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल वानखडे, श्री मधुकरराव भोपळे आणि वैभव म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते आदरणीय खाडे साहेब शिक्षण, प्रशासन व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे निष्ठावान अधिकारी आहेत. कामाची सचोटी, पारदर्शक व्यवहार आणि माणुसकी ही त्यांची ओळख आहे. ते एक नामवंत कादंबरीकार असून नुकतेच *'कृत्रिम प्रज्ञा'* या कादंबरीचे प्रकाशन झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. 

'साधी राहणी, उच्च विचारसरणी' जपणाऱ्या खाडे साहेबांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त व निरोगी दीर्घायुष्यासाठी सर्वांनी अनंत शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या