Ticker

6/recent/ticker-posts

पो.स्टे.वाढवणा येथे रक्तदान शिबीर संपन्न...रक्तदात्यांना हेल्मेट वाटप,१५१ जणांचे रक्तदान..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी (वा) :-भालचंद्र ब्लड बॅंक लातुर व रोटरी कल्ब आॅफ मिडटाऊन लातुर आणि पोलिस ठाणे वाढवणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ रोजी स.१० ते ६ पर्यंत आयोजित रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी रक्तदात्यांना हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले.तसेच १५१ रक्तदात्यांपैकी ६ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले.हे विशेष..!
या प्रसंगी वाढवणा ठाण्यातील सपोनि.सुनील गायकवाड,पोहेकाॅ.संजय दळवे,शिवप्रताप रंगवाळ,दत्ताञ्य वाडकर,संजय कलकत्ते या कांही पोलिस बांधवांसह १५१ जणांनी रक्तदान केले.यावेळी सर्व रक्तदात्यांना पोलिस अधिक्षक अमोल तांबे,डीवायएसपी.अरविंद रायबोले, सपोनि.सुनील गायकवाड यांच्या हस्ते हेल्मेट देण्यात आले.
रस्ते अपघातात मरण पावलेल्यांपैकी बहूतांश व्यक्ती केवळ हेल्मेट नसल्याने मरण पावले आहेत.जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
जि.प.गटनेता तथा आरोग्यदुत रामभाऊ तिरुके, पं.स.सभापती संगम अष्टुरे,शिवा हाळ्ळे,पञकार यादुल डांगे,पप्पू पाटील यांनी रक्तदान शिबीर स्थळी भेट देऊन या उपक्रमाचे कौतूक व स्वागत केले.
पोलिस मिञ अतुल बिरादार,पोहेकाॅ.माधव सारोळे,ईकराम उजेडे,बालाजी हुलाजी कलकत्ते, होमगार्ड सर्वश्री उत्तम जाधव,हुसेनखां पठाण, अशोक कांबळे,अजय हाळने,आकाश नागपुर्णै व सहका-यांनी शिबीर यशस्वी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या