चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:-नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. ५ मध्ये विकासकामांना सुरुवात झालेली असून मंजूर करण्यात आलेल्या १० लक्ष रुपये निधीच्या सिमेंट रोड व सिडी वर्क (नाली) बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. हे बांधकाम प्रभाग ५ मधील रहांगडाले यांच्या घरापासून ते अरविंद पुस्तोडे यांच्या घरापर्यंत करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष देवेश्री कापगते, नगरसेवक इंजि. संदीप बावनकुळे आणि नगरसेविका मेघाताई बडवाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रभागातील नागरिकांचे रस्ते आणि सांडपाण्याची समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. दर्जेदार कामाच्या माध्यमातून प्रभागाचा चेहरामोहरा बदलविण्याचा माझा मानस आहे. असे मनोगत प्रभाग ५ मधील नगरसेवक संदीप बावनकुळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन हेमराज भाजीपाले, आभार अरविंद पुस्तोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिलीप नाकाडे, नामदेव करंजेकर, वाघमारे, पवार, कृष्णा बडवाईक


0 टिप्पण्या