सर्वत्र हळहळ, अचानक कुटुंबाचा आधार हरपला.
चित्रा न्युज प्रतिनिधी
कुरखेडा (गडचिरोली) दि. ४ मे २०२६:- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील सोनकुसरे विद्यालयात कार्यरत असलेले निरुचंद कचरु इंदुरकर यांचे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान अचानक निधन झाले . मृत्यूसमयी ते ५२ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे गावात, नातेवाईक, परिसरात आणि कर्मचाऱ्यांमध्ये फारच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे प्रशंसनीय कार्य होते. त्यांच्या निधनामुळे परिवारावर डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी , पत्नी , भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. आज दिनांक ४/५/ २०२६ रोजी दुपारी १ - ०० वाजताच्या दरम्यान तळेगाव येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


0 टिप्पण्या