Ticker

6/recent/ticker-posts

श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ रुपला नाईक तांडा चे अध्यक्ष पाच वर्षाकरिता निलंबितसहायक धर्मदाय आयुक्त नांदेड यांचा निर्णय

चित्रा न्युज प्रतिनिधी 
माहूर -  माहूर तालुक्यातील जुने शिक्षण प्रसारक मंडळ असलेल्या श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ रुपला नाईक तांडा ता. माहूर जि.नांदेड नोंदणी क्रमांक एफ २०२२ नांदेड  चे अध्यक्ष यादव रुपलाजी जाधव यांचे विरुद्ध अर्ज  चौकशी क्र. ०८/२०१०  जुना व  चौकशी क्र. ०८/२०२४ नवीन व्दारे  करण्यात आलेल्या चौकशी नुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.
         सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान  प्रतिवादी, श्री.  यादव रुपला जाधव हे म.प्र. न्यास अधिनियमाच्या (M.P.T. Act) कलम ४१(१)(क) आणि ३४(१)(क) अन्वये दोषी आढळले असल्याने  त्यामुळे, "श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, रुपला  नाईक तांडा, माहूर, जि. नांदेड" (नोंदणी क्र. F-२०२२, नांदेड) या न्यासाच्या विश्वस्तपदावरून त्यांची पाच (०५) वर्षांच्या कालावधीसाठी गच्छंती (पदच्युती) करण्यात येत आहे; तथापि, हा आदेश माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या रिट याचिका क्र. १११९९/२०२३ च्या निर्णयाच्या अधीन दिला असल्याचे निर्णय आदेशात नमूद करण्यात आले आहे. अपिलार्थी क्र.१  लोभा कानू नाईक व अपिलार्थी क्र. ३ बापूराव महादू कुमरे  यांचे निधन झाले असल्याने, त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांतून त्यांची मुक्तता (Discharge) करण्यात आली आहे.  तसेच, अपीलार्थी क्र. २, शांताराम जोधाराम जाधव.  ४ शिवराम हरिका जाधव , अपिलार्थी क्र. ५  काशीराम नत्थू सलाम आणि इतर तीन विश्वस्त - मारोती फकिरा राठोड, शेषराव हिरामण जाधव  आणि उत्तम तेलसिंग राठोड  यांचीही त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांतून मुक्तता करण्यात आली आहे. 
       सदर प्रकरणात सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड श्रीमती एच. के. शेळके यांच्या समोर ४ सप्टेंबर २०२५ रोजी अंतिम सुनावणी झाली होती. दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त श्रीमती एच.के. शेळके यांनी आदेश पारीत केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या