Ticker

6/recent/ticker-posts

एमआरपी व दरवाढी विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-वस्तूंच्या एमआरपी मधील  किमतींमध्ये प्रचंड तफावत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे . या बाबीची दखल घेऊन एमआरपी मध्ये योग्य ती सुधारणा करण्यात येऊन ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना योग्य दरात वस्तू उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने आज दिनांक 25 मे 2025 रोजी  संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्यात आलेले आहे.देशात शासकीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोहीम राबविण्यात येत आहे. 
यास्तव आज दिनांक 25 मे 2025 रोजी श्री राजेंद्र कुमार जाधव ,अतिरिक्त जिल्हाधिकारी भंडारा तसेच श्री ठाकरे ,जिल्हा पुरवठा अधिकारी यांना एमआरपी बाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली आणि निवेदन सादर केले .तसेच त्यांना हे निवेदन मा.जिल्हाधिकारी भंडारा मार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्याबाबतची विनंती करण्यात आली.निवेदन देतांना सर्वश्री नितीन काकडे, अनिल शेंडे,जयंत सब्जीवाले,रविन्द्र तायडे,राजेश पांडे,मोहम्मद सईद शेख, रमेश पारधी, लोकेश मोहबंसी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या