(सिल्लीत आधुनिक अभ्यासिकेचे लोकार्पण)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा:-स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये, या उदात्त हेतूने तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेचे सिल्ली येथे लोकार्पण करण्यात आले. ही अभ्यासिका या परिसरातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला बळ देणारी ठरणार आहे.
लोकप्रतिनिधी विकास कामे करताना रस्ते, नाल्या आणि सभामंडप हीच मानसिकता ठेवून कार्य करतात. परंतु सिल्ली येथील पंचायत समिती सदस्य *प्रशांत खोब्रागडे* यांनी दूरदृष्टी ठेवत, परिसरातील तरुणांच्या भविष्याचा विचार केला. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात असलेल्या एका हॉलचे अभ्यासिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घेत ही अत्याधुनिक अभ्यासिका साकारण्यास सुरुवात झाली. त्यांच्या विकास निधीतून वातानुकूलित वातावरणासह सर्व साधनांनी युक्त अभ्यासिका उदयास आली.
या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही. अभ्यासिकेचे नियोजन व्यवस्थित चालावे म्हणून याची जबाबदारी एका व्यक्तीकडे सोपविण्यात आली आहे.
अभ्यासिकेचे उद्घाटन *24 मे* रोजी भंडाऱ्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ *डॉ. यशवंत लांजेवार*, गावच्या सरपंच सुचिता पडोळे*ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक मोहम्मद सईद शेख इत्यादी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्रास्ताविकातून प्रशांत खोब्रागडे यांनी "ही अभ्यासिका युवक-युवतींचे आयुष्य घडविणारी ठरावी" अशी अपेक्षा व्यक्त केली. गावागावात उभ्या होणाऱ्या अभ्यासिका ही सकारात्मक बदलाची नांदी असून, परंपरागत विकास कामांना फाटा देत अभ्यासिकेची निर्मिती करीत एक वेगळा आदर्श प्रशांत खोब्रागडे यांनी ठेवला. या अभ्यासिकेतून "स्वतःच्या आयुष्य घडविण्यासाठी तरुणांनी प्रामाणिक कष्ट घ्यावेत" असे आवाहन डॉ. लांजेवार यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी ग्रीन हेरिटेजचे मो.सईद शेख यांनी "सिल्ली गावाला निसर्गाने 90/.टक्के पाण्याने तुडुंब भरलेले रमणीय तलाव आणि भरपूर हिरवळी असे वरदान दिले आहे." शिक्षण,जल _पर्यावरण आणि ग्रामीण विकास असा हा त्रिवेणी संगम इथे साकारत आहे. अभ्यासिकेच्या माध्यामातून मुलांना साक्षर करून गाँववासियांनी जल व पर्यावरण संरक्षण करिता संकल्प करावे असे प्रतिपादन केले. पत्रकार विजय नीचकवड़े, शिर्डीचे उपसरपंच आनंद सुखदेवे, दवडीपारचे सरपंच किरण मेश्राम, बोरगाव चे सरपंच संजय लांजेवार,अंबाडीचे सरपंच साजन भोईदे, सुरेश चोपकर, रामनाथ चोपकर,मोरेश्वर साखरवाडे,दीपक लांजेवार,चेतन घनमारे ,गोपाळ आकरे,अन्नाजी रोकडे,जागेश्वर बडगे,रूमदेव माकडे,संजय गिरीपूंजे,दीपक मेश्राम यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संदीप मेश्राम यांनी केले.


0 टिप्पण्या