Ticker

6/recent/ticker-posts

निसर्गाच्या रक्षकांना वाचवण्यासाठी कमांडो ग्रुप चे सुंदर प्रयत्न


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-भंडारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रणी असलेले ग्राम गोपीवाडा येथील कमांडो ग्रुप कडून निसर्गाचे राजकुमार असलेले  सुंदर पक्षी,,यांना वाचवण्यासाठी बर्ड सेव,,हे अभियान राबविण्यात आले,, सध्या उष्माघाताचे वाढलेले अत्यंत अधिक प्रमाण,, ह्या जीवघेण्या उष्म कारणे मानवाचेच नाही तर पक्षांचे ही बेहाल झाले आहे,, पक्ष्यांची ही व्यथा लक्षात घेता कमांडो ग्रुप गोपीवाडा( शहापूर) या संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर डोळस, यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या संपूर्ण टीम नी जवळ जवळ 100  पाण्याचे  व खाद्याचे पॉट जंगल पहाडी परिसरात लाऊन प्रेरणादाई कार्ये हाती घेतले,, त्यांच्या या टीम मध्ये  डीएसए, कॉलेज शहापूर  चे प्रशिक्षणार्थी  जयंत बोरिवार, कमांडो ग्रुप चे, तुषार झलके, सौरभ गभने, चिन्मय मने, सागर वानखेडे, सर्वज्ञ झंजाळ, श्रेयस वडीचार , विवेक  झंझाळ, रोहित धोतरे राणी सारवे, लक्ष्मी भदाडे, समीक्षा वैद्य, माही विजय वैद्य, अशा बऱ्याच बाल गोपाल व  युवकांनी *बर्ड सेव* या अभियानाला यशस्वी बनविले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या