चित्रा न्युज प्रतिनिधी
कोल्हापूर :-राजेंद्र यशवंत कुंभार रा.वडणगे ता. करवीर या नावाने सी.पी.आर.मध्ये एम.एल.सी.दाखल आहे या एम.एल.सी.नुसार राजेंद्र कुंभार यांना वडणगे येथे झालेल्या मारहाणीत डोक्यामध्ये कुऱ्हाडीचा घाव लागून १२ते१३ टाके पडले होते त्यानुसार त्यांच्या डोक्यातून जास्त रक्तस्त्राव होऊन त्यांना ४ ते ५ दिवस छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सीपीआर या ठिकाणी उपचार घ्यावे लागले होते ३२६३\२०२६ या एम.एल.सी. नुसार करवीर पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपी वरती०९\०३\२०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असताना संबंधित इन्चार्ज सी.एम.ओ. डॉ. यांनी १७\३\२०२६ रोजी या गुन्ह्यामध्ये नॉर्मल रिपोर्ट देऊन गुन्ह्यातील गुन्हेगाराला पुन्हा गुन्हा करण्यासाठी वरदान दिले होते त्यामुळे गुन्हातील संबंधित आरोपीला नॉर्मल कलम लागून आरोपी मोकाट सुटलेला आहे संबंधित कुंभार यांची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाकडे आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ अनेक वेळा छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे अधिष्ठता डिन डॉ. भिसे यांना भेटले असता या केसबाबतची गंभीरता रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने डॉ.भिसे यांना लक्षात आणून दिली असता आपल्याकडील संबंधित इन्चार्जर डॉक्टर यांनी संगणमत करून संबंधित गुन्ह्यामध्ये आरोपीला नॉर्मल रिपोर्ट देण्यासंदर्भात हात मिळवणी केलेली आहे असे असताना संबंधित इन्चार्जर डॉक्टर यांनी डॉक्टर भिसे यांना कोणतीही दाद न देता अनेक वेळा त्यांचा फोन न उचलणे त्यांना अवॉर्ड करणे तसेच "हम करे सो कायदा" अशा पद्धतीची वर्तणूक करून संबंधित राजेंद्र कुंभार यांच्या नातेवाईकांना इन्चार्ज डॉक्टर यांनी फोनवरून धमकावले आहे असे असता संबंधित इन्सार्जे डॉक्टर वरती डीन डॉ. भिसे यांनी दोन वेळा मे.मो. काढून त्यांच्या कामाची दखल सर्विस बुक मध्ये नोंद केली आहे एवढे होऊनही संबंधित महाशय डॉक्टरांनी कोणतीही दाद न घेता रिपब्लिकन पक्षाने पाठपुरावा केला असता ४० ते ४५ दिवसांनी सदरचा रिपोर्ट बदलून त्या रिपोर्ट मध्ये गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे असा रिपोर्ट पुन्हा तयार केला असता हा रिपोर्ट संबंधित करवीर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी इशू करून घ्यावा लागतो पण त्याआधीच संबंधित पोलिसांनी गुन्हाबाबतील तपासणी पूर्ण करून संबंधित गुन्ह्याबाबतची चार्जशीट पोलिसांनी कोर्टात जमा केली आहे यामुळे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयु.दत्ता मिसाळ(आण्णा) रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु.सतीश माळगे(दादा) यांना याची दाट शक्यता येऊन संबंधित इन्चार्ज डॉक्टरने या गुन्ह्यातील चार्जशीट तयार होण्यासाठी ४०ते ४५ दिवसाचा वेळ देऊन ती चार्जशीट दाखल करण्यासाठी वेळ घालवला का असा प्रश्न पडला असता चार्जशीट दाखल झाल्यानंतर संबंधित नॉर्मल रिपोर्टचा गंभीर स्वरूपाचा रिपोर्ट तयार केला त्यामुळे सदर गुन्ह्यातील आरोपीला या महाशय डॉक्टरांनी सुटका करण्यासाठी मदत केलेली आहे का? त्यामुळे आरोपी मोकाट सुटून कुंभार कुटुंबीयांवरती अन्याय होणार आहे म्हणून आज छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे डीन डॉ. भिसे यांना भेटून पुढील मागण्या करण्यात आल्या संबंधित चुकीचे आणि बेजबाबदार वागणाऱ्या डॉक्टरला तात्काळ सेवेतून कमी करा जोपर्यंत सेवेतून कमी करत नाही तोपर्यंत त्याला सक्तीच्या रजेवर पाठवा तसेच संबंधित गुन्ह्याबाबतचा गंभीर स्वरूपाचा रिपोर्ट हा आपल्या मार्फत कोर्टामध्ये दाखल करून संबंधित कुटुंबीयांना न्याय द्यावा अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षाच्या वतीने सी.पी. आर.रुग्णालयाच्या दारात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आयु.दत्ता मिसाळ तसेच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव आयु.सतीश माळगे यांनी दिला आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राधानगरी तालुक्याचे नेते कुंडलिक कांबळे,रिपब्लिकन पक्षाचे कागल तालुक्याचे नेते बाबासाहेब कागलकर,पूनम कुंभार अजिंक्य कुंभार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.*


0 टिप्पण्या