ट्रॅक्टर पकडला, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त!
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील रेती तस्करांनी आणि माफियांनी कितीही हायटेक फिल्डिंग लावली, तरी वरठी पोलिसांच्या ‘थर्ड आय’ आणि धडाकेबाज कामगिरीपुढे त्यांचे काहीच चालत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने झडप घालत तब्बल ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
सिनेस्टाईल कारवाई
दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ०९:०० वाजताच्या सुमारास वरठी पोलिसांचे एक विशेष पथक खाकीचा रुबाब बाजूला ठेवून एका खाजगी वाहनाने गुन्हेगारांचा माग काढत पेट्रोलींग करत होते. पथक मौजा सुभाष वार्ड (वरठी शहरापासून २ कि.मी. पूर्व) भागात पोहोचले असता, पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेला एक संशयास्पद ट्रॅक्टर रेतीने भरलेली ट्रॉली घेऊन जाताना दिसला.
पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचा सुगावा लागताच तस्करांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पो. हवा. शैलेश माणिकराव आगासे आणि त्यांच्या पोलीस स्टाफने मोठ्या शिताफीने व फिल्मी स्टाईलने वाहनाची नाकाबंदी करून त्या ट्रॅक्टरला घेरले.
आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल
पोलीसांनी ट्रॅक्टर चालकाकडे रेती वाहतुकीच्या पास आणि परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टरसह संपूर्ण माल जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
आरोपी चालक/मालक रोशन दुर्योधन भुरे (वय २१ वर्ष, रा. गांधा वार्ड, वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा).
जप्त केलेला मुद्देमाल
१) स्वराज ८४३ एक्स.एम. कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (विना क्रमांकाचा, चेसिस क्र. ॅग्ज् ७६६१९११२२७७ इंजिन क्र. क्श्रत्श्रच् १२४१८) – किंमत ₹६,००,०००/- २) ट्रॅक्टरला जोडलेली विना क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॉली – किंमत ₹१,००,०००/- ३) ट्रॉलीमध्ये भरलेली अंदाजे ०१ ब्रास बेकायदेशीर रेती – किंमत ₹६,०००/-
एकूण जप्त किंमत: ₹७,०६,०००/- (सात लाख सहा हजार रुपये)
वरठी पोलिसांत गुन्हा दाखल तपास सुरू*!
फिर्यादी पो. हवा. शैलेश आगासे यांच्या लेखी रिपोर्टवरून वरठी पोलीस ठाण्यात आरोपी रोशन भुरे याच्याविरुद्ध अपराध क्रमांक २५९/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची धडाकेबाज कामगिरी वरठी पोलीस ठाण्याच्या पथकाने चोखपणे बजावली असून, पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात ग्रॅ. पो. उपनिरीक्षक शेंडे (मो. क्र. ९७६४७३०१४१) आणि पो. हवालदार मासुरकर हे अत्यंत वेगाने करीत आहेत


0 टिप्पण्या