Ticker

6/recent/ticker-posts

4000 हून अधिक लाभार्थ्यांसह युथ सोशलग्राम फाउंडेशनचे "75 डेज स्प्रेड सेवा 2.0 चॅलेंज" यशस्वीरित्या संपन्न

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : नीती आयोग, भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत सामाजिक संस्था युथ सोशलग्राम फाउंडेशन यांनी 1 एप्रिल 2026 रोजी सुरू केलेले "75 डेज स्प्रेड सेवा 2.0 चॅलेंज" यशस्वीरित्या पूर्ण केले. संस्था मागील 5 वर्षांपासून देशभरात विविध सामाजिक व जनहितकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेत सातत्याने कार्यरत आहे.

संस्थेचे सह-संस्थापक अमित भारद्वाज यांनी सांगितले की, या विशेष अभियानाचा उद्देश सलग 75 दिवस समाजाच्या विविध क्षेत्रांत सेवा कार्य करणे हा होता. 14 जून 2026 रोजी या अभियानाचे 75 दिवस पूर्ण झाले. या काळात संस्थेचे 18 राज्यांमध्ये कार्यरत स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आणि अनेक जनकल्याणकारी उपक्रम यशस्वीरीत्या राबवले.

संस्थापक योगेश चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की, या अभियानांतर्गत संस्थेने एकूण 174 पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी (सकोरे) बसवली, 3 स्वच्छता अभियानांचे आयोजन केले, 520 विद्यार्थ्यांना ब्राइट एज्युकेशन कार्यक्रमाचा लाभ दिला तसेच 131 वृक्षांची लागवड केली. याशिवाय 7 जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आणि भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर 1,340 हायड्रेशन किट्सचे वितरण करण्यात आले.

संस्थेचे सह-संचालक अॅड. नाहरसिंह यांनी सांगितले की, मानवसेवेच्या क्षेत्रात संस्थेने 80 हून अधिक युनिट रक्तसंकलन करून रक्तदान शिबिर आयोजित केले, तसेच 120 महिलांना मासिक पाळी स्वच्छता किट्सचे वितरण केले. गरजू दिव्यांग बांधवांना 5 व्हीलचेअर्स प्रदान करण्यात आल्या.

मानवता आणि जीवसेवेला प्राधान्य देत स्वयंसेवकांनी 331 प्राण्यांना अन्न उपलब्ध करून दिले, 435 अन्नपॅकेट्सचे वितरण केले तसेच 70 गरजू व्यक्तींना कपड्यांचे वाटप केले. याशिवाय संस्थेने दोन वेळा वृद्धाश्रमाला भेट देऊन सुमारे 70 महिलांसोबत वेळ घालवला आणि त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.

संस्थेच्या सह-संचालिका प्रियांका भारद्वाज यांनी सांगितले की, सामाजिक कार्यांसोबतच संस्थेची डिजिटल पोहोचही उल्लेखनीय राहिली. अभियानादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संस्थेला 43 लाखांहून अधिक (4.3 मिलियन+) व्ह्यूज प्राप्त झाले. त्यामध्ये इन्स्टाग्रामवर 15.4 लाख, यूट्यूबवर 14.1 लाख आणि फेसबुकवर 13.6 लाखांहून अधिक व्ह्यूज समाविष्ट आहेत.

या 75 दिवसीय उपक्रमाच्या यशस्वी आयोजनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा दीपिका, सचिव मोहित कुमार आणि सहसचिव सिद्धार्थ शर्मा यांनी सर्वांचे आभार मानत सांगितले की, संस्था भविष्यातही देशहितासाठी अशाच प्रकारे अग्रणी भूमिका बजावत राहील. या 75 दिवसीय उपक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करणारी रश्मी कामठी आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे रुपेश कुत्तरमारे ,मयूर हनवते, आणि सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे योगेश करचे या सर्वांच्या सहाय्याने आपल्या महाराष्ट्राचे नेतृत्व या 75 दिवसीय स्प्रेड सेवा 2.0 चॅलेंजेस यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या