चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : सध्या देशपातळीवर गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशा संदर्भात नीट परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे .
यापूर्वी वैद्यकीयदृष्ट्या शिक्षणाकरिता वर्ग बारावीच्या गुणाच्या मेरीटनुसार वैद्यकीय प्रवेश दिला जात होता आणि त्यानुसारच देशातील मोठमोठे डॉक्टर, तज्ञ डॉक्टर तयार झालेले आहेत.
 परंतु अलीकडे राष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय प्रवेशा करता नीट परीक्षा धोरण शासनातर्फे राबविण्यात येत आहे. परंतु नीट परीक्षेत होत असलेले पेपर फुटी ही होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या जीवावर भेट बेतलेली असून जे श्रीमंत विद्यार्थी आहेत आणि जे पेपर पैशाने खरेदी करून परीक्षा देऊ शकतात त्यांचे भवितव्य या परीक्षेच्या माध्यमातून घडविण्यात येत आहे परंतु जे पैसे खर्च करू शकत नाही, पेपर विकत घेऊ शकत नाही परंतु खऱ्या अर्थाने हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना या परीक्षेत कुठलाही वाव नाही .वारंवार होणाऱ्या नीटच्या पेपर फुटी मुळे होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांचे जीवन उद्धवस्त होत आहे.विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागत आहे तद्वतच बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत.
 त्यामुळे हे नीट परीक्षा हा एक शासनाच्या वतीने चालवण्यात येत असलेला गोरख धंदाच आहे.
 ही देशभरात होत असलेली नीट परीक्षा कायमची रद्द करण्यात यावी आणि पेपर फुटीत जे जे शिकवणी वर्ग चालवणारे संचालक दोषी आढळलेले आहेत त्यांना कठोर शिक्षा करावी,पूर्वीप्रमाणे वर्ग बारावीच्या मेरीट प्रमाणे वैद्यकीय प्रवेश देण्यात यावे त्याचप्रमाणे या पेपर फुटी करीता जबाबदार असलेले मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा व त्यांना पद मुक्त करावे . विद्यार्थ्यांच्या जीवनाशी होत असलेला खेळ खंडोबा ताबडतोब थांबवावा अन्यथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाभर युवकांचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा चंद्रपूर जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे देशाच्या राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू व  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उपरोक्त विषयाची मागणी देखील करण्यात आली आहे .
यावेळी जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष आनंद तिराणकर,जिल्हा संपर्कप्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर जुमनाके,महानगर पालिकेचे नगरसेवक लहू मरस्कोल्हे,जिल्हा शहर अध्यक्ष बेबीताई उईके, जिल्हा महिला कार्याध्यक्ष नीलिमा आत्राम, जिल्हा मुख्यालय महासचिव अरविंद परचाके , जिल्हा उपाध्यक्ष अशोक अलाम, जिल्हा महिला उपाध्यक्ष पुष्पा सिडाम, चंद्रपूर शहर महिला संघटिका सारिका गेडाम,चंद्रपूर शहर अध्यक्ष किशोर शेडमाके, सचिव नीलकंठ येरमे, प्रभाग 17 चे अध्यक्ष दिलीप आत्राम, अधिकारी, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सुनील अलाम,महिला सचिव वैशाली चांदेकर, शहर उपाध्यक्ष उषा आत्राम, तालुका उपाध्यक्ष सुरेश किन्नाके यासह बहुसंख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.