Ticker

6/recent/ticker-posts

विदर्भाच्या निसर्गवैभवाला शब्दात बंदिस्त करण्याचे स्वप्न अखेर धुळीस


पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या देहवसाननंतरही अरण्यऋषीची शोकांतिका 

रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली:- मारुती चितमपल्ली हे नाव विदर्भात माहीत नाही असे होणार नाही. परंतु २०१५ च्या नंतरच्या पिढीला माहीत असेल याबाबत शंका कुशंका आहे. अरण्यऋषी म्हणून ज्यांना पदवी मिळाली, ज्यांनी संपूर्ण हयात नवेगाव बांध अभयारण्य आणि माधवराव पाटील डोंगरवार यांच्या सहवासात घालवली. साकोली जवळील नागझिरा अभयारण्य ज्यांनी पालथा घालून निसर्गवैभवाला सोनेरी आणि शाब्दिक कोंदन लावले त्याच अरण्यऋषीच्या विदर्भातील निसर्गवैभवाला शब्दात बंदिस्त करण्याचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले. पद्मश्रीप्राप्त अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या देहवसनानंतरही विदर्भाच्या मराठी मातीत मराठीच्या सारसस्वतःंनी साकारलेली ही शोकांतिका. मारुती भुजंगराव चितमपल्ली ५ नोव्हेंबर १९३२ रोजी सोलापूर येथे जन्म तर १८ जून १९२५ रोजी सोलापूर येथे वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केवळ वन अधिकारीच नव्हे तर मराठी वन्यजीव, अभ्यासकआणि लेखक म्हणूनही ते नावारूपास आलेले होते. वन अधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्ष नोकरी आणि त्यानंतर एकूण ६५ वर्षे त्यांनी जंगलात काढले. जंगलातील प्राणी, जीवन आणि त्यांचे बारकावे रेखाटणारी लेखन त्यांनी सर्जनशीलपने आणि ओघवत्या शैलीत केले. ३० एप्रिल २०२५ रोजी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले होते. मत्स्यकोश आणि वृक्षकोशाचे संकलन सुरू असतांना  मारुती चितमपल्ली यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आयुष्याच्या साधनेतील ही दोन स्वप्न अपुरी राहिली. आज १९ जून म्हणजे त्यांना कालच्या तारखेपर्यंत जाऊन १ वर्ष झाले.
पक्षी कोषानंतर त्यांनी प्राणीकोशाचे काम हाती घेतले. वय वाढत होते. शरीर साथ देत नव्हते. पण ज्ञान साधनेची ओढ कायम होती. भारतातील सुमारे ४५० प्रजातीच्या प्राण्यांचा समावेश असलेल्या या कोशात मराठी संस्कृत, पाली, आणि प्राकृत या प्राचीन भाषांबरोबरच तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि गुजराती भाषांतील नामवलीचाही समावेश करण्यात आला होता. ६ वर्षाच्या परिश्रमानंतर साकारलेला हा ग्रंथ आता प्रकाशनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. परंतु जीवनाच्या उत्तरार्धात मात्र नियतीने त्यांचे कठोर परीक्षा घेतली. पत्नी आणि मुलीच्या निधनानंतर एकाकीपणाचे सावट अधिक गडद झाले तरी त्यांनी नागपूर आणि विदर्भाची साथ सोडली नाही. आपल्या कामावर त्याचा परिणाम होऊ नये या विचारातून त्यांनी वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयाचा मार्ग धरला. तिथल्या ३ वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी प्राणीकोशाचे काम पूर्णत्वास नेले. पण वयाच्या ८८ व्या वर्षी हा कणखर मनाचा अरण्यऋषी आयुष्याच्या काही वास्तवांसमोर हळवा झाला. एखाद्या दिवशी आपण एकटेच पडून राहू आणि कुणालाही त्याची खबर लागणार नाही ही भीती त्यांना स्पर्शून गेली. अखेर मनावर दगड ठेवून त्यांनी विदर्भाला निरोप दिला. १० ऑक्टोंबर २०२० रोजी ते आपल्या मूळ गावी सोलापूरला रवाना झाले. शरीराने ते सोलापुरात गेले पण त्यांचे मन मात्र विदर्भातील जंगलातच रेंगाळत राहिले. सोलापुरात गेल्यानंतरही त्यांची लेखणी थांबली नाही. मत्स्यकोष आणि वृक्षकोशाच्या कामालाही त्यांनी सुरुवात केली. विदर्भाच्या नद्या, तलाव आणि वनसंपदेचे ज्ञान शब्दबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र काळाने त्यांना पुरेसा अवधी दिला नाही. या दोन्ही कोशाचे संकलन सुरू असतांना त्यांनी जगाचा निरोप घेतला. आणि त्यांच्या आयुष्यभराच्या साधनेतील हे दोन स्वप्न अखेर अपुरीच राहिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या