चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व पदवीधर, पदवीधरक अंशकालीन संघटनेच्या वतीने १३/६/२०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ११ ते ३ वाजता दरम्यान सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेला जिल्ह्यातील पदवीधर, पदवीधारक अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेले आहे. महाराष्र्ट राज्यातील सर्व पदविधर/पदविधारक अंशकालीन शासकिय कर्मचारी संघटना यांचे वतीने राज्यातील शासकिय/निमशासकिय विभागात २००५ नतंर २७ /१०/ २००९ चा शासन निर्णयातील निर्गमीत झालेल्या निर्णयान्वये सरळ सेवेच्चा भरती प्रक्रियेतील गूणवत्तेनी शासन सेवेत रूजू झाले. परंतू शासकिय कर्मचारी यांचे २००५ पूर्वीची वेगवेगळ्या विभागातील शासकिय कार्यालयात तीन (३) वर्षे कामकाज केलेल्या प्रमाणपत्राच्चा आधाराची सेवा ग्राह्य धरूण ती सेवा नियमीत करूण जूणी पेन्शन देण्याबाबदचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष यांनी राज्य सरकारला निवेदने दिले. त्यात शासनाकडून काही प्रतिसाद न मिळाल्याने लतीफ पठाण विरूद्ध राज्य सरकार अशा दोन याचिका मा. उच्च न्यायपालिकेच्या खंडपीठ न्यायाधिकरण औरंगाबाद येथिल न्यायालयाने दिं. २४ /४/ २०२६ असे निर्णय राज्य सरकार यांचे मूख्य सचिव यांना १२ आठवड्याचा निर्णय घेण्यासंबंधी आदेशित केले. त्या अनूषगांने दिंनाक १३ /६/ २०२६ रोजी महाराष्र्ट राज्यातील ३ वर्षे काम केलेल्या पदविधर अंशकालीन शासकिय कर्मचारी यांची कैलासवासी भानुदास चव्हाण स्मृती सभागृह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जवळ रेल्वे स्टेशन रोड उस्मानपुरा संभाजीनगर औरंगाबाद येथे भव्य बैठक बोलवण्यात आलेली आहे. महाराष्र्ट राज्यातील विद्यमान आणि सेवानिवृत्त झालेले सर्व कर्मचारी यांनी व्यक्तीश: हजर राहून आपले म्हणणे लेखी स्वरूपात संघटनेच्चा पदाधिकारी यांना कळवावे असे आवाहन संघटना भंडारा जिल्हाप्रमुख कीर्ती डांगे यांनी केलेले आहे.


0 टिप्पण्या