संपादिका प्रीती साहू यांचा ठाम संकल्प; सहज सुचलंच्या लेकींशी दिलखुलास गप्पा
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर: अमरावतीच्या नामवंत वुमेन्स न्यूज चॅनलच्या संपादिका प्रीती साहू यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यात मोठी घोषणा केली - "चंद्रपूर शहरात लवकरच वुमेन्स न्यूज चॅनल सुरू करु!" महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, कर्तृत्ववान महिलांना व्यासपीठ देणारे हे चॅनल आता चंद्रपूरच्या लेकींचा आवाज बनणार आहे.
प्रीती साहू यांनी ग्रामीण व शहरी भागातील अनेक कर्तृत्ववान महिला व तरुणींच्या भेटीगाठी घेतल्या. सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका विद्या पिंजरकर यांच्या निवासस्थानी जेष्ठ साहित्यिक अॅड. मेघा धोटे यांच्यासह सहज सुचलंच्या सदस्यांशी त्यांचा अडीच-तीन तास दिलखुलास संवाद झाला.
सावलीच्या कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसीलदार साधना धकाते, समाजसेविका सुवर्णा लोखंडे, कवयित्री वंदना उपगन्लावार, नवोदित कवयित्री प्रियंका बेन्द्रे व प्रख्यात नाट्य कलावंत टीना उराडे यांनी सहभाग नोंदवला.
प्रीती साहू यांचे आगमन होताच सहज सुचलं समूहाने पारंपरिक पद्धतीने पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. पत्रकार किरण घाटे यांनी 'विदर्भाचे वीर' अंक भेट दिला. अंक पाहून प्रीती साहू म्हणाल्या, "एक दर्जेदार अंक असून तो निश्चितच वाचकांच्या पसंतीस पडेल!"
*कला आणि संवादाचा संगम:*
1. टीना उराडे यांनी नाटकातील प्रसंग सादर करून दाद मिळवली. "तिच्या कलेला तोड नाही" अशी प्रतिक्रिया उमटली.
2. शिक्षिका वंदना उपगन्लावार यांनी मधूर गीत गाऊन रसिकांची मने जिंकली.
3. प्रियंका बेन्द्रे यांनी प्रीती साहू यांचा परिचय करून देत स्वतः कवयित्री कशी झाली याची कहाणी सांगितली.
*प्रीती साहू काय म्हणाल्या?*
"समाजसेविका मायाताई कोसरे व अॅड. मेघा धोटे यांनी नेहमीच मार्गदर्शन केले. रंजू दिलीप मोडके यांची भेट झाली नाही याचे दुःख आहे, पण त्यांचे कार्य मोठे आहे. किरण घाटे दादांच्या प्रयत्नामुळे माझा हा दौरा यशस्वी झाला. चंद्रपूरात वुमेन्स न्यूज चॅनल सुरू करण्याचा माझा ठाम संकल्प आहे."
रखरखत्या उन्हातही प्रीती साहू यांनी भेटीगाठी घेतल्या. 'गुलाबी नाश्ता'चा आस्वाद घेत अडीच-तीन तास कसे गेले कळलेच नाही. सरते शेवटी निरोप घेताना सहज सुचलंच्या सदस्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगले.
----------------------------------------------------
चंद्रपूरच्या लेकींसाठी खुशखबर!
अमरावतीच्या 'वुमेन्स न्यूज चॅनल'ची चंद्रपूरात एन्ट्री. संपादिका प्रीती साहू यांचा ठाम निर्धार. सहज सुचलंच्या मेघा धोटे, विद्या पिंजरकर, टीना उराडे यांच्याशी 3 तास खलबतं. महिलांचे प्रश्न, कला, साहित्य आता 'वुमेन्स न्यूज'वर झळकणार. किरण घाटे यांची महत्त्वाची भूमिका.


0 टिप्पण्या