Ticker

6/recent/ticker-posts

साकोलीत गाळ उपसांचे कार्य प्रगतीपथावर


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 साकोली : साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील तिन्ही ठिकाणी तलाव व बोळी खोलीकरणास मंजुरी मिळाली आहे. सदर काम प्रगतीपथावर असून जिल्ह्यात साकोली व्यतिरिक्त कोणत्याही तालुक्यात ही मंजुरी मिळाली नसून जिल्ह्यात पहिलीच मंजुरी  साकोलीला प्राप्त झाली आहे. लोकसहभागातून साकोली सेंदूरवाफा या दोन्ही शहरातील साकोली तलाव गट क्र. २३८ व सेंदूरवाफा गट क्र. ४४२ व २३०/१ तलाव मधून गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचे कार्य साकोलीत सुरू आहे. यासाठी नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांनी सतत पाठपुरावा करून नाम फाऊंडेशनशी संपर्क साधला व पत्रव्यवहार केला. लोकसहभागातून म्हणजे शुन्य अनुदानातून आज जवळपास तिन्ही बोळींवर ५० ते ६० ट्रॅक्टर लाऊन हे गाळ उपसण्याचे कार्य सुरू आहे. यामुळे ६० युवकांना रोजगार सुद्धा प्राप्त झाला. या कार्याने साकोली सेंदूरवाफा परीसरातील तलाव व बोळींचे जलस्रोत वाढण्यास मदत होणार आहे. यात पंचशील वार्ड क्र. ५ एक बोळी, प्रगती कॉलनी १ बोळी व सेंदूरवाफा येथील मुख्य गावतलाव यांचा समावेश आहे. १९/०५/२०२६ ला जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि. प. लघु पाटबंधारे विभागाने साकोली सेंदूरवाफा येथील तिन्ही तलाव बोळी खोलीकरणास नाम फाऊंडेशनला मंजुरी देण्याबाबत उपविभागीय जलसंधारण अधिकारी साकोली यांना पत्र दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या