चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा : अश्वघोष कला सांस्कृतिक मंच वर्धा द्वारा आयोजन " लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती निमित्त " भव्य राज्यस्तरीय बुद्ध भीम गायन स्पर्धा शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी वेळ सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्थळ : बजाज वाचनालय वर्धा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला काटोल शहरातील सुप्रसिद्ध गायिका आशा मेंढे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धनंजय नाखले यांनी केले आहे. तरी जास्तीत जास्त गायक कलावंतांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे


0 टिप्पण्या