Ticker

6/recent/ticker-posts

वन विभागाचे अधिकारी कोणत्या मुहूर्ताच्या शोधात ?

 गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक नाही 
                

 प्रकरण गिरोला येथील वृक्षतोडीचे 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली :- गिरोला जपानी येथील वन समिती अध्यक्ष युवराज पर्वते यांनी वनविभागाला फेब्रुवारी २०२४ रोजी सदर झाडे आमची संमती असल्याशिवर कापण्याची अनुमती देण्यात येऊ नये. तसेच१४ मे रोजी वनविभागाचे अधिकारी यांना तक्रार केली की सामाईक गट नंबर १६० मधील सागवान व आडजात वृक्ष आमची परवानगी न घेता अर्जदार यादव पर्वते यांनी लाकूड ठेकेदार यांचे मदतीने कापून परस्पर उचलून दुसरीकडे नेली. याप्रकरणी संबंधित दोषीवर कार्यवाही करावी. परंतु आज रोजी पर्यंत वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी कोणता मुहूर्त शोधतात असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
वनविभागाचे आर. ओ. राज मेश्राम यांचे कडे ११/११/२०२५  ला अर्जदार यांनी संमती पत्रासहीत वृक्ष तोडीचा परवाना देण्याबाबद अर्ज दाखल केला. त्यानुसार आर. ओ. यांनी प्रकरण संपूर्ण कागदपत्रा सहित आर. एफ. ओ. धनविजय यांचेकडे दाखल केले. आर. एफ. ओ. यांनी आदेश देऊन उभ्या झाडांचा पंचनामा करण्यास सांगितले. आर. ओ. व वनरक्षक यांनी पंचनामा केला. तलाठी दिनेश भोंगडे यांनी सात बारा मध्ये वृक्षांची नावे व नग यांची नोंदणी करून दिली. आर. एफ. ओ. धनविजय यांनी झाडे तोडण्याची अनुमती दिली. त्यानुसार अर्जदार यांनी ठेकेदार यांचे मदतीने १० व ११ मे २०२६ रोजी झाडे कापली. तक्रारदार यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली. आमची अनुमती नसताना झाडे कशी कापली. वनविभागाचे अधिकारी यांनी याची दखल घेऊन अर्जदार यांना पुन्हा दुसरा संमती पत्र मागितला. १४ मे २०२६ चा संमती पत्र ज्यात ४ जणांच्या खोट्या सह्या करण्यात आल्या आहेत. अर्जदार यांचेवर दबाव टाकून सदर झाडे मी स्वतः कापली आहेत असे पत्र लिहून मागितले. २१ मे रोजी सदर वृक्षतोडीची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे वॉटसअप वरून आर.एफ.ओ. धनविजय यांनी सांगितले. तक्रारदार यांनी डी. एफ. ओ. योगेंद्र शिंग यांची २२ मे रोजी भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. डी. एफ. ओ. यांनी कारवाही न करता कापलेली झाडे दुसरीकडे अंदाजे १० किलोमीटरवर नेण्यास भाग पाडले व दोषींची मदत केली. तक्रारदार यांनी केलेल्या कारवाहीची लेखी स्वरूपात माहिती आम्हाला द्यावी असे पत्रात नमूद केले होते. वनविभागाने कोणतीही कारवाई केल्याची माहिती तक्रारदार यांना दिली नाही. तक्रारदार यांनी २ जून २०२६ रोजी सी. सी. एफ.  गुरुप्रसाद नागपूर यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनी दोन दिवसात कार्यवाही करून माहिती देतो असे सांगितले. आतापर्यंत कोणतीही माहिती सी. सी. एफ. यांनी दिली नाही. एकीकडे वृक्ष तोडीचा परवाना स्वतःचे स्वाक्षरीने आर.एफ.ओ.यांनी दिला. त्यानुसार झाडे कापण्यात आली. दुसऱ्या बाजूस वृक्ष तोडीचा परवाना नाकारत असल्याचे २१ मे रोजी पत्र दिले. आर. एफ. ओ. तक्रारदार यांच्या तक्रारीची वाट पाहत होते काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अधिकारात मागितलेल्या कागद पत्रात संमती पत्र १४ मे २०२६ रोजी अर्जदार यांचेकडून लिहून घेतले तेच संमती पत्र दिले. हेतुपुरस्पर ११/११/२०२५ रोजी कागदपत्रासोबत दिलेले संमती पत्र दिले नाही. एकीकडे दोषींवर गुन्हे नोंदविले आहेत असे वनविभागाचे अधिकारी सांगतात. त्यानुसार दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. राज मेश्राम यांनी मी स्वतः.उभ्या झाडांचा पंचनामा करताना हजर होतो असे का लिहिले नाही. त्याच वेळी आरोपी यांना अटक का केली नाही. अर्जदार /आरोपी जेवढे दोषी आहेत तेवढेच वनविभागाचे अधिकारी दोषी आहेत. सी. सी. एफ. नागपूर यांनी तत्काळ कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी तक्रारदार युवराज पर्वते यांनी केली आहे.
_____________________________________________

तक्रारदार यांनी फेब्रुवारी २०२४ ला दिलेल्या तक्रार अर्जाची दखल का घेतली नाही. (२ ) आर एफ. ओ. धनविजय यांनी डोळे बंद करून झाडे कापण्याची अनुमती दिली का ? ( 3) स्वतःचे सहीने अनुमती दिली तर २१ मे चे परवानगी नाकारण्याचे पत्र का दिले. (४) ११/११/२०२५ ला कागदपत्रासोबत दिलेले संमती पत्र कुठ गायब केले. (५) १४ मे रोजीचे संमती पत्र माहिती अधिकारात का दिले? डी. एफ. ओ. यांनी कार्यवाही न करता दोषींना मदत का केली ? गुन्हा दाखल होऊनही आरोपीना अटक  का केली नाही ?
युवराज पर्वते.
तक्रारदार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या