Ticker

6/recent/ticker-posts

ताडोबा रोडवर 'झोपडीतला बार' उद्ध्वस्त!

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा, 4 ग्राहकांसह मालकावर गुन्हा; 21,950 चा मुद्देमाल जप्त


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर: राज्य उत्पादन शुल्क विभाग, वरोराच्या पथकाने शनिवारी ताडोबा रोडवरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थाई टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर ठिकाणी परवानगीशिवाय मद्य विक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यास आवश्यक ते साहित्य व सेवा पुरविण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले.
 
कारवाई दरम्यान मुकेश मधुकर रामटेके, विकास विठोबा किरमीरे, राजेश चंद्रकांत वाघ, अंबादास नानाजी थेरे हे 4 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करतांना आढळून आले. तसेच आशिष नत्थुजी खोब्रागडे हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. 

ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 च्या कलम 65, 68 व 84 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या मोहिमेत देशी दारुच्या 200 सीलबंद बाटल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्कीच्या 29 बाटल्या अशी एकूण 15,270 रुपये किमतीची दारु, काउंटरवर असलेली 2,750 रुपये रोख रक्कम व इतर साहित्य मिळून 21,950 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक दत्तात्रय वरठी, दुय्यम निरीक्षक प्रमोद राजोते, सचिन पोलेवार, सोमेश्वर गव्हारे, जवान जगदिश मस्के, अमोल भोयर, रामचंद्र अम्मावार, संजयकुमार हरीनखेडे, सुजित चिकाटे, महिला जवान सुकेशनी कारेकर, विलास महाकुलकर यांनी सहभाग घेतला.

*नागरिकांना आवाहन:*  

नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारु, अवैध मद्यपान अड्डे किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान होत असल्याची माहिती मिळाल्यास, त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर त्वरित कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे अधीक्षक नितीन धार्मिक या़नी कळविले आहे.

________________ _________________

झोपडीतला 'बार' सील! एक्साईजचा ताडोबा रोडवर छापा
  
कोयना गेटजवळ टिनाच्या झोपडीत अवैध दारूविक्री व मद्यपान अड्डा उद्ध्वस्त. 4 ग्राहक रंगेहाथ पकडले, वैद्यकीय अहवालात मद्यप्राशन 'पॉझिटिव्ह'. मालक आशिष खोब्रागडेवर गुन्हा. देशी-विदेशी दारू, रोख रक्कमसह 21,950 चा माल जप्त. अवैध अड्ड्याची माहिती 18002339999 वर द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या