Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक योग दिन सप्ताहानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : बोपापूर (ताडाळा) : जागतिक योग दिन 2026 निमित्त देशभरात योग सप्ताह साजरा करण्यात येत असून त्याच अनुषंगाने आज बोपापूर (ताडाळा) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास गावातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 105 ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. योग आणि आरोग्य जनजागृतीसाठी देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत.

शिबिरामध्ये हेल्पेज इंडिया, वरोरा येथील टीमने आरोग्य सेवा प्रदान केली. यावेळी डॉ. विनय कुंभारे, राशेदा शेख (सामाजिक संरक्षण अधिकारी), वैभव देठे, फार्मासिस्ट तसेच संदीप काले (वाहनचालक) यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रूपेश कुत्तरमारे व प्रेरणा कुत्तरमारे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर कुत्तरमारे, आशा वर्कर लीलाताई वासेकर आणि शिवछत्रपती युवा क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

उपस्थित मान्यवरांनी नियमित आरोग्य तपासणी, योगाभ्यास व निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. शिबिरामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व प्राथमिक तपासणीची सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या