(सिल्ली येथे वृक्षारोपणाने पर्यावरण दिन साजरा
सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम)
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग, भंडाराच्या वतीने विनोद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,सिल्ली येथे ५ जून रोजी शाळेच्या परिसरात विविध देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य दादाराम मस्के होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक मोहम्मद सईद शेख तथा सिल्लीचे पर्यावरण प्रेमी पद्माकर डुंभरे,शाहीर कार्तिकस्वामी मेश्राम, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक किरण मेश्राम, शिक्षिका मिनाक्षी बालपांडे, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी गौरी नेवारे, तसेच विभागाचे रवी दहीकर, कुर्वेशी वंजारी, राकेश चौरे, वर्षा कोहळे, प्रमोद मस्के, कृष्णा मस्के, जनार्दन फटीक इत्यादी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"सिल्ली येथील लागवड केलेल्या झाडांचा वारसा आणि तलावाचे संवर्धन करून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी इतर गावांनी आदर्श घ्यावा. वन वाचवले तर मानवाचे आयुष्य वाचेल, त्यामुळे वनाचे रक्षण व संवर्धन ही काळाची गरज आहे." असे ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक मोहम्मद सईद शेख यांनी मार्गदर्शन केले.
*लावलेली झाडे जगवणे महत्त्वाचे*
पर्यावरण दिनी केवळ झाडांची लागवड करून सोडू नये, तर त्या झाडांचे जतन व संगोपन करणे महत्त्वाचे आहे. लावलेले प्रत्येक झाड जगले पाहिजे, ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.असे पर्यावरण प्रेमी पद्माकर डुंभरे यांनी मत व्यक्त केले .
पर्यावरण गीतातून जनजागृती
पृथ्वीवर असणारे सर्व सजीव घटक म्हणजे पर्यावरण होय, आणि या घटकांना जिवंत ठेवण्याचे काम झाडं करतात. वाढते तापमान रोखण्याचे कामही झाडंच करतात. सर्वांच्या मानवी जीवनाचे कल्याण करणे हाच सामाजिक वनीकरण विभागाचा उद्देश असल्याचे
शाहीर कार्तिकस्वामी मेश्राम यांनी पर्यावरण गीत सादर करून झाडाचे महत्व सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.जगदीश ब्राह्मणकर यांनी केले तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी गौरी निवारे यांनी मानले.


0 टिप्पण्या