Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसच्या ' विचार विभाग ' प्रदेश सरचिटणीस आणि विदर्भ प्रभारी पदी भंडारा येथील गणेश लिमजे यांची नियुक्ती '

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभाग सरचिटणीस व विदर्भ प्रभारीपदी भंडारा येथील गणेश घनश्याम लिमजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसोबतच त्यांच्याकडे नागपूर आणि संपूर्ण विदर्भ विभागाच्या प्रभारी पदाची मोठी जवाबदारीही सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने गणेश लिमये यांची नियुक्ती करण्यात आली.
गणेश लिमजे हे भंडारा शहरातील डॉ. आंबेडकर वार्ड, अशोक नगर भंडारा येथील रहीवासी आहेत. त्यांनी . आपल्या जिवणात सामाजिक आणि राजकीय कार्य सण २०१३ ला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष पद भूषवले. व सण २०२१ पर्यंत कार्यरत होते.
सण २०२१ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागा तर्फे प्रदेश उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक म्हणून कार्य सांभाळले.
६ वर्षापासून नागपूर / विदर्भ विभाग मधे विदर्भातील ६ जिल्हे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर संघटन बळकट केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग प्रदेश उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक म्हणून सर्व कलावंत लोकांना न्याय मिळवून योजना त्याचा पर्यंत पोहचवल्या व त्यांना महाराष्ट्र शासन कडून मानधन देखील मिळून दिले. सण २०२५ ला एकता फाउंडेशन सामाजिक संघटना मध्ये महाराष्ट्र राज्य प्रभारी नियुक्ती झाली. आणि त्यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन २०२५ मध्ये सन्मानित करण्यात आला.
बेरोजगार युवा संघटनामध्ये सन - २०१६ मध्ये भंडारा जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यात आली.
एवढेच नाही तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये सन - २०२१ जिल्हा सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून नियुक्ती झाली व ४ वर्ष कार्य केले.
अशा विविध संघटनेच्या माध्यमातून व राजकीय प्रवास करत असतांना त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
पक्ष संघटना मजबुत करण्यावर भर प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की ' गणेश लिमजे यांनी ताकाळ आपले पदभार स्विकारुण पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करावे. नागपूर आणि विदर्भ विभागात काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ही नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे. सर्व स्वरांतून अभिनंदनाचा वर्षाव गणेश लिमजे यांच्या या निवडीमुळे भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
त्यांनी आपले नियुक्तीची श्रेय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानसभा माजी अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ प्रशांत पडोळे यांना दिले.
*नियुक्ती बद्दल कौतुक*
भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर तसेच भंडारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयश्रीताई बोरकर, प्रदेश महासचिव जियाभाई पटेल, प्रदेश सचिव जय डोंगरे, रोजगार / स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष पवन मस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष कविताताई उईके, जिल्हा परिषद सभापती शितलताई राऊत, जिल्हा परिषद सदस्य  प्रेमभाऊ वनवे, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, अभिजित वंजारी, धनराज साठवणे, नगरसेवक कमल साठवणे, विवेक पडोळे, पृथ्वीराज तांडेकर इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या निवडीबद्दल त्यांनी पक्ष ने नेतृत्वाचे आभार मानले असून , पक्ष संघटना अधिक बळकत करण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या