Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-दि.१५ जून सोमवारी रोजी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांच्या ९० व्या. वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास संघटना लातूर जिल्हा शाखेच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. आज सकाळी ६ वाजता राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक दुतर्फा मार्गावर १५०० झाडांचं वृक्षारोपण करण्यात आले.  सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय दवाखाना लातूर येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.तात्यासाहेब नंदवे नांदगावकर, जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुंटेवाड, जिल्हा उपाध्यक्ष बालासाहेब शिंदे अतनूरकर, आरोग्य जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सहसचिव राजेंद्र दुबे, उदगीर तालुका अध्यक्ष राजाभाऊ भंडे, लातूर तालुका अध्यक्ष अरविंद शिंदे, औसा कार्यकारणी सदस्य आत्माराम मिरकले, जळकोट तालुकाध्यक्ष बी.जी.शिंदे, अनिकेत धोत्रे तसेच जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम दि. १५ ते ३० जून पर्यंत लातूर जिल्ह्यातील विविध तालुका, गाव शाखेत विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार असून अण्णा हजारे यांच्या जन आंदोलनाची चळवळ, माहिती अधिकार कायदा, लोकपाल विधेयक व राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास संघटनेचे काम व कार्य सर्वसामान्य जनतेला या उपक्रमातून ओळख करून दिली जाणार आहे. असे जिल्हा अध्यक्ष प्रा. तात्यासाहेब नंदवे यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या