Ticker

6/recent/ticker-posts

व्यायाम व योगा करा नियमित,आयुष्य लाभेल तुम्हा सुरक्षित:वैशाली गिरीपूंजे


व्यायाम व योगा करा नियमित,आयुष्य लाभेल तुम्हा सुरक्षित:वैशाली गिरीपूंजे

गतीमान जीवनात नसे व्यायामाला वेळ,
काम उरकेना तयां सारा संगणक खेळ!
बैठे काम सांभाळता भर वजनाची पडे
,लवचिक तनू राहे जिथे योगासन घडे
योगा करता आजार, राहील कोसो दूर
व्यायाम व योगा करा नियमित   
आयुष्य लाभेल तुम्हां सुरक्षित!
 योग केवळ एक व्यायाम प्रकार नसून ती जीवन जगण्याची एक कला आहे. नियमित योगासने आणि प्राणायाम केल्याने शरीराची लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात 
 आजच्या धावपळीच्या आणि संगणक-युगातील जीवनशैलीत बैठे काम करणाऱ्या लोकांना पाठदुखी, मानदुखी आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी दररोज काही मिनिटांचा योगाभ्यास सर्व आजारांना कोसो दूर  ठेवतो.असे आपले मनोगत जागतिक योग दिना निमित्त योग शिक्षिका सौ. वैशाली गिरीपूंजे मॅडम यांनी व्यक्त केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या