Ticker

6/recent/ticker-posts

आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात पुन्हा शिवसेनेचे वैभव उभारू - स्वप्निल अण्णा जाधव

चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर :- सध्या सत्ता आणि पैसा या दोन गोष्टीचा वापर करून पक्ष फोडणे आमदार फोडणे आणि खासदार फोडणे असे कार्यक्रम जरी हाती घेतले गेले असले तरी जनसामान्याच्या मनातील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा कोणीही पुसू शकत नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची अस्मिता जागी केली. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. सुरुवातीला चळवळीच्या स्वरूपातून तयार झालेली संघटना पुढे राजकीय पक्ष बनला. लोककल्याणकारी भावना आणि लोककल्याणकारी योजना राबवणारी संघटना म्हणून राजकारणामध्ये ही यांना पदार्पण करतात यश मिळाले. काही दिवस व्यवस्थित झाले. बाळासाहेब जिवंत असताना गद्दारी ची भाषा केल्यानंतर काय होते? हे बाळासाहेबांनी दाखवून दिले होते. गद्दारांना चांगला धडा शिकवला होता. मात्र त्यानंतर शिवसेनेला सत्ता येऊन देखील गद्दारीचे ग्रहण लागले आणि मराठी माणसाच्या भावनांना ठेच पोहोचू लागली. गद्दारी करणाऱ्याला त्याच वेळी जर धडा शिकवला असता, तर ही गद्दारी वाढली नसती परंतु शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सामंजस्य पूर्ण भूमिकेचे धोरण पक्ष संघटनेला कायद्याच्या चौकटीत राहिला सांगायला भाग पाडले. परिणामतः गद्दारांना मोकळीक मिळाली. पण आता बस झाले. आता जो कोणी गद्दारी करेल त्यांना मतदारसंघात फिरू द्यायचे नाही असा संकल्प शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. शिवसैनिकाची ताकद या गद्दारांना माहिती आहे. भलेही पोलिसाचे कडुळे घेऊन ते येतील, पण हे कडबोळे किती दिवस त्यांच्या भोवती राहील? हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या जीवाला विचारावा. स्वतःच्या जीवाची आणि स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता ज्या शिवसैनिकांनी शिवसेना वाढवली त्यांच्या जीवावर ही बांडगुळे सत्तेत आली आणि आता त्याच निष्ठावंताच्या जीवावर वेतन्याचा प्रयोग करत आहेत हे सर्वसामान्य शिवसैनिक कधीही सहन करणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केली आहे. या गद्दारांना मतदारसंघात फिरू द्यायचे नाही असा संकल्प त्यांनी केला आहे. कितीही पोलिसांचा बंदोबस्त घेऊन आले तरीही एक तर यांच्या सभेवर यांच्या बैठकावर बहिष्कार घाला, बापाला बाप पूर्ण म्हणणाऱ्या अवलादीना त्यांची जागा दाखवा. असे आवाहन स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे. 
आपण लातूर जिल्हा शिवसेनाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार अंबादास दानवे यांच्या प्रेरणेने लातूर जिल्ह्यात शिवसेनेला नवचैतन्य मिळवून देऊ असे आश्वासन प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्निल अण्णा जाधव यांनी सांगितले आहे. 
शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनामध्ये होती, सर्वसामान्य मराठी माणसाच्या हृदयामध्ये होती ती शिवसेना पुन्हा नव्यादमाने उभा करून या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी आ. अंबादास दानवे यांच्या साक्षीने त्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल यांना जाधव यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, युवा सेना समन्वयक उपेंद्र कलबुरे, उदगीर समन्वयक व्यंकट साबणे, जळकोट तालुकाप्रमुख सारंग आगलावे, उदगीर शहर संघटक मंगेश येरकुंडे, उदगीर तालुकाप्रमुख प्रशांत मोरे यांच्यासह शिवसेनेचे मराठवाडा पदवीधर समन्वयक दिलीप घुगे जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव भारत सांगवीकर विष्णुपंत साठे लक्ष्मण पेठकर दिनेश जावळे अविनाश रेशमी दत्ता हिंगणे अनिकेत फुलारी शिवा कासले प्रतिक रेड्डी गणेश हलसे पवन देऊळकर बाळासाहेब पडले बालाजी काळे गणेश राठोड तुकाराम लोकरे माऊली देवकते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना स्वप्निल अण्णा जाधव म्हणाले की, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जीवाचे रान करून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात वेळ देऊन सभा घेतल्या, मतदारांना भावनिक आवाहन केले, त्यामुळे शिवसेनेची भूमिका आवडल्यामुळे जनतेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पारड्यात मतदान केले. परंतु दुर्दैवाने पैसा आणि सत्तेच्या लोभाने काही लोक त्यांच्याशी बेईमान झाले. अशा बेईमानांना मतदार संघात सर्वसामान्य प्रामाणिक मतदार कधीही थारा देणार नाही. इतकेच नाही तर अशा गद्दारांना त्यांच्या घरात देखील च्छीथू झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केला आहे. 
अशा गद्दारांच्या सोबत येणाऱ्या इतर नेत्यांना देखील झोडपून काढण्याची भाषा हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच केली होती. दुर्दैवाने त्याचे प्रात्यक्षिक कुठेच झाले नाही, पण आता ते प्रात्यक्षिक जागोजागी करण्याची वेळ आली आहे. ह्या लाचार आणि भ्रष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि गद्दारीला धडा शिकवण्यासाठी दिसेल तिथे जोडा आणि जुडवा हे बाळासाहेबांचे धोरण राबवणे गरजेचे आहे असे मला वाटते या शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्नील अण्णा जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना विचार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या