चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती /परतवाडा :-सालाबाद प्रमाणे यावर्षी ही 28जुलै रोजी शिवप्रेमी घनश्याम रामबिलास अग्रवाल (गुरु )याच्या मार्गदरणात परतवाडा कावड यात्रा संघ चे शिवभक्त कावड घेऊन बिहार झारखंड जवळील देवघर स्थित बाबांधाम पोहचतील व बाबांधाम मधील शिवलिंगाचे पवित्र जलाने जलाभिषेक करतील
उल्लेखनीय बाब म्हणजे पौराणिक काळात महान शीवभक्त रावणाने बाबांधाम मध्ये भव्य शिलिंगाची स्थापना केली होती जेथे भारतातील अनेक राज्यातून लाखो शिवभक्त कावड यात्रा काढून शिवलिंगाचे जला भिषेक करतात मागिल 35वर्षांपासून परतवाडा शहरातील शिवभक्त कावड यात्रेद्वारे बाबांधाम पोहचतात व जला भिषेकचा लाभ घेतात
यंदाही शिवप्रेमी घनश्याम रामबिलास अग्रवाल याच्या मार्गदर्शनात परतवाडा कावड यात्रा संघातर्फे पट्टलवार लाईन येथील योगेश डिस्पॉजल शॉपी येथून 28 जुलैला कावड्यात्रा निघून पोलीस स्टेशन परिसरातील शिव मंदिरात पूजा अर्चना करून कावडप्रेमी व्हाया बैतुल मार्गे सुलतानपूर पोहचतील तेथून पवित्र जल घेऊन देवघर स्थित बाबांधम्म चे दर्शन घेऊन पवित्र जलाने जलाभिषेक करतील
बाबांधाम येथून परतवाड्याचे शिवप्रेमी काशी बनारस रवाना होतील वतेथून अयोध्ये कडे प्रयाण करून प्रभूरामाचे दर्शन करून 7ऑगेस्ट रोजी परतवाडा पोहचतील
यां भव्य कावड यात्रेत सहभागी होणारे शिवभक्तमध्ये योगेश अग्रवाल, अमित बाजपेयी, नरेश लोखंडे, मनीर किराये, प्रवीण अग्निहोत्री, शुभम तिडके, मनिष गनोरकर, जगदीश तिवारी, अतुल ठोसर, व रवींद्रसिंग बघेल याचा समावेश राहणार आहें
अशी माहिती योगेश अग्रवाल यांनी मीडिया ला दिली


0 टिप्पण्या