नगर विकास संघर्ष समितीकडून चौकशीची मागणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : भंडारा जिल्हयातील तालुका मोहाडी येथील नगरपंचायतीतील अनेक कर्मचारी अधिकृत ओळखपत्रासिवाय कार्यरत आहे. नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर विकास संघर्ष समितीने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कार्यवाहीची मागणी केली आहे.
शासकिय कार्यालयामध्ये पारदर्शकता, सुरक्षा आणि उत्तरदायित्वासाठी ओळखपत्र महत्वाचे मानले जाते. नियमाचे पालन होत नसल्यास सुरक्षेच्याही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कंत्राटी व नवीन कर्मचाऱ्यांनाही अधिकृत ओळखपत्र देणे आवश्यक आहे.
नगर विकास संघर्ष समितीचे खुशाल कोसरे , बबलू सय्यद, पुरुषोत्तम पातरे , व अनिल न्यायखोर यांनी प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून सर्व कर्मचार्यांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावीत. कार्यालयीन वेळेत त्यांचा वापर बंधनकारक करावा अशी मागणी केली आहे.
*नागरिकांना करावा लागतो अडचणींचा सामाना*
नगरपंचायतीच्या विविध विभागांमध्ये कार्यरत काही कर्मचारी ओळखपत्र परिधान करत नसल्याने ते अधिकृत कर्मचारी आहेत की नाहीत. याबाबद खात्री होत नाही. जन्म - मृत्यू दाखले , कर , पाणीपुरवठा स्वच्छता आदी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून प्रशासनाने याची दखल घेऊन ओळखपत्र प्रदान करावा अशी मागणी नगर विकास संघर्ष समितीने केली आहे.


0 टिप्पण्या