चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-दि. १२ जून २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भंडारा शाखेच्या वतीने भंडारा शहरात रॅली काढण्यात आली. गांधी चौक, बस स्थानक, त्रिमूर्ती चौक, मिस्कीन टॅंक गार्डन इत्यादी ठिकाणी नागरिकांना एमआरपी विषयी माहिती देण्यात आली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत भंडारा शाखेचे जयंत भाजीवाले, चंद्रशेखर साठे, रवींद्र तायडे, अनिल शेंडे, राजेश पांडे, सईदभाई, रमेश पारधी आदी पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले.


0 टिप्पण्या