Ticker

6/recent/ticker-posts

शासकीय निधीची प्रतीक्षा न करता लोकसहभागातून तयार होत आहे जलमंदिर

प्रभाग क्र.५ मध्ये नगरसेवक संदीप बावनकुळे यांची विलोभनीय संकल्पना 

 

रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली:-" गावकरी करी ते राव न करी "अशी आपल्या ग्रामीण भागात एक म्हण आधीपासून प्रचलित आहे. या म्हणीचे प्रत्यंतर  राज्यातील अनेक गावात आतापर्यंत प्रत्येक दिसून आले. त्यामुळे गावे आणि खेडी आदर्श होऊ लागली स्वच्छ होऊ लागली, सुंदर दिसू लागली, गावातील विविध प्रश्न मार्गी लागू लागली. त्यामुळे गावे सुजलाम आणि सुफलाम होऊ लागली. शासनाच्या निधी येईल तेव्हा येईल पण आपल्या परिसरातील प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा असेल तर आपणास समोर यावे लागेल अशी संकल्पना तयार झाली आणि बघता बघता साकोली नगरपरिषद प्रभागातील ५ मधील नागरिकांनी आपल्या प्रगत प्रभागातील नगरसेवकाच्या सहकार्याने केवळ संकल्पनाच केली नाही तर प्रत्यक्षात कृतीतून दाखवून दिले. समस्याग्रस्त परिसरातील बोळी खोलीकरण झाल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नाही त्यामुळे नागरिकांनी लोकसभागातून या कामाला हातभार लावला आणि कामास सुरुवात झाली. या प्रभागाचे नगरसेवक संदीप बावनकुळे यांच्यावर या परिसरातील नागरिकांनी टाकलेला विश्वास आणि संदीप बावनकुळे यांनी या परिसरातील नागरिकांना मागितलेला लोकसहभाग आणि हातभार यामुळे शासनाच्या निधीची वाट न बघता कामाला प्रारंभ झाला. त्यामुळे इतर प्रभागाकरिता आता हे उदाहरण आदर्श ठरू लागलेले आहे. सविस्तर प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शासकीय निधीची वाट न पाहता लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या जोरावर काय घडू शकते याचे एक आदर्श उदाहरण प्रभाग क्रमांक ५ मध्ये दिसून आले. परिसरातील हनुमान मंदिर जवळील बोडीचे (तलावाचे) खोलीकरण करणे व पाळ भरण्याच्या महत्त्वपूर्ण कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. नगरसेवक तथा गटनेता संदीप बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि हनुमान ध्यान साधना समितीच्या विशेष सहकार्यातून हे काम पूर्णपणे लोक सहभागातून हाती घेण्यात आले आहे. या परिसरातील उन्हाळ्यात पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी व पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी या बोडीचे खोलीकरण करण्यात येत आहे. संदीप बावनकुळे यांनी परिसराचा विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेत या कामाचे नियोजन केले. बोडीचे खोलीकरण केल्यामुळे पाणी साठवणूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार असून उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर यामुळे यशस्वी मात करता येईल असा विश्वास परिसरातून व्यक्त केला जात आहे. याबरोबरच बोडीच्या खोली करणासोबतच त्याच्या बाजूची पाळ ( तलावाची भिंत ) माती भरून मजबूत करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. यामुळे परिसराला सुरक्षितता लाभणार आहे. हनुमान मंदिर परिसराच्या सुशोभीकरणालाही यामुळे मोठी गती मिळणार आहे. आगामी काळात हा परिसर नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल अशा पद्धतीने काम केले जात आहे. कोणत्याही शासकीय निधीची किंवा मंजुरीची वाट न पाहता, केवळ लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या अनोख्या जलसंधारण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हनुमान ध्यान साधना समितीचे पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने दररोज या कार्यात स्वतःला झोकून देत आहेत. या भव्य विकासकामामुळे प्रभाग ५ च्या वैभवात आणि सौंदर्यात नक्कीच भर पडेल अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. हे काम केवळ एक साधे विकासकाम नसून लोकसहभागातून उभे राहिलेले जलमंदिर आहे. हनुमान ध्यान साधना समिती आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेला उत्साह दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. _______________________________________________

हे काम केवळ एक साधे विकासकाम नसून लोकसहभागातून उभे राहिलेले 'जलमंदिर' आहे. हनुमान ध्यान साधना समिती आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेला उत्साह, दिलेले योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्वांच्या परिश्रमरुपी सहकार्याने प्रभागाचा कायापालट करणे हेच माझे ध्येय आहे. प्रभागमधील नागरिकांनी माझ्यावर टाकलेला विश्वासाला तडा जाणार नाही याची मी खात्री  देतो. 

इंजि. संदीपभाऊ बावनकुळे.
नगरसेवक साकोली नगरपरिषद,
तथा गटनेता (काँग्रेस )
_______________________________________________

आमच्या प्रभागात आणि आमच्या परिसरात ज्या पद्धतीने कार्य सुरू आहेत त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कधी नव्हे एवढा कायापालट आमच्या परिसरात दिसत आहे याचे आश्चर्य वाटते. प्रभागातील जनप्रतिनि नक्कीच प्रभागाच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक असतील तर प्रभागाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. इंजि. संदीपभाऊ बावनकुळे नगरसेवक प्रभाग क्रमांक ५ मध्ये प्रभावीपणे काम करीत असून अगदी नियोजनपूर्वक काम करीत असल्याने परिसरातील नागरिक समाधानी आहेत. त्यांच्याकडून उत्तरोत्तर अशी प्रगतीपूर्वक विकासाची कामे होत राहील एवढी अपेक्षा आणि आमच्याकडून जेव्हा केव्हा त्यांना लोकसहभाग लागेल तेव्हा आम्ही नक्की त्यांना सहकार्य करू.

रामनाथ मेश्राम.
रहिवासी, प्रभाग क्रमांक ५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या