कॉंग्रेस तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांचे तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन
जयकुमार अडकीने चित्रा न्युज
माहूर- शहरातील विविध समस्या सोडविण्याच्या मागणी करिता येत्या २९ जून रोजी सायंकाळी ४ वा. पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा कॉंग्रेसचे माहूर तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी तहसीलदार माहूर व मुख्याधिकारी न.प. माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. माहूर शहरातील नागरिक विविध समस्यांना सामोरे जात आहेत. त्यामध्ये माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे सन २०१७ पासून २०२६ पर्यत मंजूर घरकुलाचे कामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचे अनुदानाचे प्रलंबित असलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करा, माहूर नगरपंचायत पंतप्रधान घरकुल योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषींविरुद्ध कारवाई करा, माहूर शहरातील सौर ऊर्जेतील जवळपास दहा कोटीच्या वर झालेला भ्रष्टाचार, पाणी पुरवठा योजनेतील 2013-14 मध्ये झालेला भ्रष्टाचार, पाणीपुरवठा योजनेतील बँकेत जमा असलेल्या साडे सोळा कोटी रुपयांचा व्याज कोणत्या विकास कामा साठी वापरण्यात आले त्याचा खुलासा शहरातील जनतेसमोर करावा त्यात किती भ्रष्टाचार झाला क बँक खात्यात किती रक्कम आहे किती रक्कम खर्च केले याबाबत लेखी खुलासा देण्यात यावा, माहूर शहरातील मुख्य रस्ता राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक नसल्याने नागरिकांना अपघाताला सामोरे जाऊन जीवित्वास मुकावे लागत असल्याने नगर पंचायत मार्फत उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग कार्यालय माहूर, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय नांदेड यांना पत्रव्यवहार करून तातडीने शहरातील मुख्य रस्त्यावर गतिरोधक मंजुनाथ पेट्रोल पंप, श्री रेणुका महाविद्यालयात, ईहगाह दर्गा,तानुशा बानुशा दरगाह, ग्यानबाजी केशवे विद्यालय त्रिमूर्ती पेट्रोल पंप, छत्रपती संभाजी महाराज विद्यालय, श्रीदत्त चौक T पॉईंट तीनही बाजूने, श्री वसंतराव नाईक चौक, ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, २०२५ मध्ये माहूर नगरपंचायत कडून रस्त्याची झालेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याने जवळपास सर्च रस्त्यावरी रस्त्यावरील गिट्टी व रस्त्यावरील गज पण उघडे पडले आहेत. या भ्रष्टाचारची उच्च स्तरिय चौकशी करण्यात यावी व संबधित दोषी कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करून सदरील रस्ते पुन्हा करून घ्यावे. नगर पंचायतच्या पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरातील नागरिकांना करण्यात येत असलेल्या वापरण्याच्या पाणी शुद्धतेबाबत दररोज तपासणी करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच शहरातील १७ वार्डात वाटर फिल्टर यंत्रणा उभारून नगर पंचायत मार्फत नागरिकांना माफक दारात फिल्टरचे पाणी उपलब्ध करून द्यावे. माहूर शहरात महावितरण कंपनीतर्फे वीज ग्राहकांना देण्यात येत असलेले स्मार्ट मीटर तात्काळ रद्द करण्यात यावे. याबाबत नगर पंचायत मार्फत महावितरण कडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा.
आदि मागण्याचा निवेदनात समावेश आहे. दिनांक २९ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वा. पासून आपल्या कार्यालयासमोर मागण्याची पूर्तता होईपर्यत शहरातील पंतप्रधान आवास योजनेचे अन्यायग्रस्त नागरिक व विविध समस्याने त्रस्त असलेल्या नागरीकासह बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार असल्याची माहिती आनंद पाटील तूपदाळे यांनी दिली आहे. घरकुल लाभार्थ्याच्या प्रलंबित हप्त्या बाबत यापूर्वी सुद्धा वेळोवेळी निवेदने दिले व आमरण उपोषणे व विविध आंदोलने केली असता दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने सदर निवेदनातील प्रमुख मागणीची पूर्तता होऊन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात घरकुल अनुदानाची रक्कम जमा होत नाही तो पर्यत आमरण उपोषण थांबणार नाही. दरम्यान उपोषणार्थीच्या जीवित्वास काहीही नुकसान झाले तर त्यास सर्वस्वी नगर पंचायत प्रशासन जबाबदार असेल असा इशारा सुद्धा देण्यात आला निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी साहेब, नांदेड , जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय नांदेड सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय नांदेड, अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय नांदेड सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट, तहसीलदार माहूर, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय माहूर, कार्यकारी अभियंता साहेब, महावितरण विभागीय कार्यालय भोकर,उप कार्यकारी अभियंता महावितरण उपविभागीय कार्यालय माहूर, मा.पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन माहूर आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या


0 टिप्पण्या