Ticker

6/recent/ticker-posts

वेगवान दुचाकीच्या धडकेत माकडाच्या पिल्लाचा मृत्यू;

 
नाट्य कलावंत टीना उराडे यांनी दाखविली माणुसकी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : अष्टभुजा प्रभाग परिसरात भरदुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेले एक माकडाचे पिल्लू रस्ता ओलांडत असताना, एका भरधाव दुचाकीस्वाराने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीच्या धडकेमुळे हे निष्पाप पिल्लू जागीच गतप्राण झाले. अपघात एवढा भीषण होता की, तिथे उपस्थित असलेल्या इतर माकडांच्या भीतीने अपघातग्रस्त तरुण गाडी सोडून पळून गेला. आजूबाजूला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, परंतु इतर माकडांच्या आक्रमकतेच्या भीतीने कुणीही पुढे येण्याचे धाडस दाखवले नाही.
नेमक्या याच वेळी कॉलेजमधून घरी परतत असलेल्या स्थानिक नाट्य कलावंत टीना उराडे यांची नजर या घटनेवर पडली. प्राण्यांविषयी अथांग प्रेम असलेल्या टीना यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ धाव घेतली. त्यांनी शेजारच्या घरातून पाणी आणून त्या छोट्या पिल्लाला पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि पिल्लाने जीव सोडला होता.
या कठीण प्रसंगी मृत पिल्लाच्या अवतीभोवती जमा झालेली इतर माकडे जणू टीना यांच्याकडे मदतीची याचना करत होती. प्राण्यांविषयीची ही आर्तता पाहून टीना उराडे यांनी तिथे उपस्थित असलेल्या एक-दोन नागरिकांच्या मदतीने पुढाकार घेतला. त्यांनी बाजूलाच एक खड्डा खणून त्या मृत माकडाच्या पिल्लावर अत्यंत संवेदनशीलतेने अंत्यसंस्कार केले. टीना उराडे यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि प्राणीप्रेमामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या