(अचलपुरातील फैजपुरा भागातील घटना)अमरावती
चित्रा न्युज प्रतिनिधी
अचलपूर :- जिल्ह्यातील अचलपूर शहरातील सुलतानपूर परिसरातील फैजपुरा भागात राहणाऱ्या एका तरुण मजुराचा छतावरून
पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी
उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून मृत्युंचे कारण न समजल्यामुळे परिसरात निरनिराळ्या संशयच्या चर्चेला उधाण आले असून घातपाताची देखील संकही व्यकतंय केल्या जात आहें
विजय पंजाबराव गाडे (वय ४०) असे हातमजुरी करणाऱ्या मृतका चे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विजय गाडे यांना शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत एक खोली मिळाली होती. मात्र घरात पंखा किंवा कुलर नसल्याने उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात त्यांना घरात राहणे कठीण जात होते. त्यामुळे ते अनेकदा घराजवळील भाग्योदय हॉलच्या छतावर झोपण्यासाठी
जात असत. सोमवारी रात्रीही ते नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी छतावर गेले होते. मात्र मंगळवारी सकाळी
भाग्योदय हॉलजवळ ते खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच घटनास्थळी गर्दी झाली. पाहणी केली असता गाडे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, विजय गाडे हे नेमके कशा परिस्थितीत छतावरून खाली पडले, याची माहिती स्पष्ट आलेली नाही. पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अधिक तपास सरमसपूरा पोलीस करत आहे. गाडे हे अविवाहित
होते. त्यांच्या पश्चात एक विवाहित बहीण असून त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


0 टिप्पण्या