चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती: शहरात नगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता, पक्के रस्ते, नाली, वीज, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा न देताच केवळ मुरूम टाकून 'रस्त्याचा आव' आणत अवैध पद्धतीने प्लॉट विक्रीचा धंदा तेजीत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार यांनी या 'मुरूमवाले' लेआऊट धारकांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे.
नगरपालिकेची ले-आऊट मंजुरी, NA ऑर्डर, विकास परवानगी काहीच नाही., सुविधा फक्त कागदावर नाल्या, डांबरी रस्ते, स्ट्रीट लाईट, पाणी लाईन न टाकताच ग्राहकांना 'विकसित प्लॉट' म्हणून गंडा., नोटरीचा 'खेळ': शासनाच्या नवीन नियमानुसार परवानगीशिवाय विक्रीला बंदी असतानाही नोटरीच्या माध्यमातून बेकायदेशीर व्यवहार करून नागरिकांची फसवणूक.,नफा प्लाट मालकांचा, भुर्दंड नगरपालिकेला : प्लॉट विकून लेआऊट मालक मोकळे. पुढे त्या भागात रस्ते-नाल्या बांधण्याचा कोट्यवधींचा भार नगरपालिकेवर पडतो.
नामोजवारांचा थेट आरोप:
"अनेक लेआऊट धारक फक्त मुरूम टाकून लेआऊट सजवतात व ग्राहकांना आकर्षित करतात. नागरिक फसतात आणि नंतर विकासकामांसाठी आम्हा नगरसेवकांना शिव्या खाव्या लागतात. हे लेआऊट मालक मात्र नफा कमावून पसार होतात," असा घणाघात नामोजवार यांनी निवेदनातून केला.
भद्रावती शहरातील सर्व संशयित लेआऊटची सखोल चौकशी करून दोषी मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी मुख्याधिकारी, न.प. भद्रावती यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी काँग्रेसच्या गटनेत्या सौ. सरिता सूर, नगरसेविका सौ. पल्लवी तामगडे, नगरसेवक अनिल पडोळे व प्रथम गेडाम उपस्थित होते.
1. *परवानगी नसताना रजिस्ट्री कशी होते?* दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिका संशयास्पद नाही का?
2. *नगरपालिकेचे अतिक्रमण पथक झोपले आहे का?* शहरात उघडपणे मुरूम टाकून प्लॉटिंग सुरू आहे, दिसत नाही का?
3. *आजपर्यंत किती लेआऊटवर कारवाई झाली?* की 'सेटिंग' लावून सगळे मॅनेज केले जाते?
----------------- ------ बॉक्स---------------------
भद्रावतीकरांनो, प्लॉट घेताय? आधी वाचा!
नगरपालिकेची परवानगी नाही, नाली-रस्ता-पाणी काहीच नाही. फक्त मुरूम टाकून 'ले-आऊट' चा बोर्ड. नोटरीवर प्लॉट विकून भू-माफिया मोकळे, भुर्दंड तुमच्या-माझ्या खिशावर. सुनील नामोजवार यांची फौजदारीची मागणी. स्वस्तात प्लॉट घेण्याच्या नादात लाखो गमावू नका!


0 टिप्पण्या