Ticker

6/recent/ticker-posts

लेबर कॉलनी येथे नवीन डीपीचे उद्घाटन; नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून दिलासा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड : लेबर कॉलनी परिसरातील नागरिकांना वारंवार कमी दाबाचा वीजपुरवठा, लोडची समस्या आणि त्यातून होणाऱ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून परिसरात नवीन डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्सफॉर्मर) बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून त्याचे उद्घाटन करण्यात आले.

या नवीन डीपीमुळे लेबर कॉलनी परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत आणि स्थिर होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.

लेबर कॉलनीतील नागरिकांनी केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले असून आता परिसराला अधिक दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी रिजवान सय्यद, तसेच नगरसेवक राहुल मधुकरराव सोनसळे (स्थायी समिती सदस्य, नांदेड महानगरपालिका तथा महानगर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी युवक) यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या