चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-आदर्श ग्रामपंचायत केसलवाडा/पवार येथे सन २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सहभागी असल्यामुळे व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाणात विभाग स्तरीय प्रथम पुरस्कारीत असल्यामुळे गावातील नागरिकांनी स्वइच्छेने श्रमदान करून स्वच्छता विषयक कामे केलेली आहेत. व मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. तसेच गावातील नागरिकांनी स्वयप्रेरणेने ३१ डिसेंबर २०२५ ला  सर्व प्रकारचे कर ग्रामपंचायतला जमा करून १००% कर वसुली करून १००% करमुक्त ग्रामपंचायत झालेली आहे. 
आज दिनांक १८ जुन २०२६  रोज गुरुवारला आदर्श ग्रामपंचायत केसलवाडा पवार येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पाहणी करण्याकरिता सकाळी ठिक ०९.०० वाजता चमूचे आगमन झाले. 
*मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बुलढाणा श्रीमती दिपाली कोतवाल मॅडम, विस्तार अधिकारी पंचायत  उमेश फुटाने* या चमूने 
1) सुशासनयुक्त पंचायत ( GOOD GOVERNANCE ), 
2) सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी), 3) जल समृध्द, स्वच्छ व हरित गाव (Climate Action), 
4) मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, 
5) गावपातळी वरील संस्था सक्षमीकरण, 
6) उपजिविका विकास,सामाजिक न्याय, 7) लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे. 
8) नाविन्यपूर्ण उपक्रम ( उद्दिष्ट 5) याची पाहणी केली.
चमूसोबत माहिती देण्याकरिता केसलवाडा/पवार येथील सरपंच रोमिला बिसेन,  ग्रा.प. सदस्य रामेश्वर बिसेन, ग्रामपंचायत अधिकारी दत्ता पोहरकर,  यांनी विविध विकास कामांची माहिती दिली, चमूच्या स्वागतासाठी गटविकास अधिकारी पानतावणे सर,  MRGS चे सर्व पदाधिकारी प.स. लाखनी, बा.वि.जुनियर अभियंता संदिप भैसारे, स.कृषी अधिकारी तेजभुषण पडोळे, पशू चिकित्सक योगेश कापगते, समाज सेवक कैलाश भगत, पदवीधर शिक्षक सतिश बागडे, पुष्पशिल गणविर, ग्रा.प. सदस्य छन्नु रहांगडाले, कविता वल्के, वंदना नंदेश्वर, अंजिरा नान्हे, आरोग्य अधिकारी माधुरी लिमजे, आशा सेविका मंगला बिसेन,  जि.प. शाळा मुख्याध्यापक केशर मासुरकर , सहाय्यक शिक्षक मिनाक्षी शिंगणजुडे, योगिता डोर्लीकर, अंगणवाडी सेविका प्रतिक्षा बोपचे, शाळा समिती अध्यक्ष जयश्री येळेकर, युवा प्रशिक्षणार्थी मिनाक्षी रहांगडाले, संगणक परिचालक लिलाधर रहांगडाले, ग्रा.प. परिचालक वनिता कावळे, सचिन वल्के जल सुरक्षक, नेहा बोपचे, शालू बोपचे, राधेलाल बिसेन, सतिश बिसेन, श्रीनंदलाल नंदेश्वर, मनिष मडामे, मुनिश्वर बोपचे, सरिता नंदेश्वर, निर्मला नंदेश्वर  इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.