Ticker

6/recent/ticker-posts

"कर्जमाफी झालीच पाहिजे!" बैलावर स्वार होऊन शेतकरी थेट तहसील कार्यालयात


गोयेगावच्या दिवाकर पाहानपटेंचे अनोखे आंदोलन; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याने प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी उचलले पाऊल; तहसीलसमोर गर्दी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर :"कर्जमाफी झालीच पाहिजे!"... या घोषणा तर तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण चंद्रपूरच्या राजुरामध्ये एका शेतकऱ्याने यासाठी जे केलं, ते पाहून सध्या संपूर्ण चंद्रपूर थक्क झालाय!

राजुरा तालुक्यातील गोयेगावचे शेतकरी दिवाकर हिरामण पाहानपटे यांनी थेट बैलावर स्वारी करत राजुरा तहसील कार्यालय गाठलं. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकला असून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी दिवाकर यांनी हे पाऊल उचललं "कर्जमाफी झालीच पाहिजे" अशा घोषणा देत जेव्हा ते बैलावर बसून आले, तेव्हा तहसील कार्यालयाबाहेर पाहणाऱ्यांची एकच गर्दी जमली होती.

🐂 कर्जमाफी झालीच पाहिजे!" बैलावर बसून शेतकरी तहसीलात!
 
राजुरा तालुक्यातील गोयेगावचे शेतकरी दिवाकर पाहानपटे यांचे अनोखे आंदोलन. कर्जाच्या विळख्यात अडकल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बैलावर स्वार होऊन थेट तहसील कार्यालय गाठले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शेतकऱ्यांच्या व्यथा पुन्हा ऐरणीवर.

---

राजुरा तहसील कार्यालयासमोर बैलावर स्वार होऊन आंदोलन करणारे गोयेगावचे शेतकरी दिवाकर हिरामण पाहानपटे. "कर्जमाफी झालीच पाहिजे"च्या घोषणा देत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या