Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावतीकरांच्या नळाला 'विष'! पिवळे पाणी, रॉकेल-डिझेलचा वास

8-10 दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा; काँग्रेस-वंचित आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना अल्टिमेट

चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती: "नळाला पाणी येतंय, पण पिता येत नाही!" अशी भयानक परिस्थिती भद्रावती शहरात निर्माण झाली आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून शहरातील विविध भागात पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असून पाण्याला रॉकेल, डिझेल व सडल्याचा उग्र वास येत आहे. या 'विषारी पाण्या'मुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रभाग क्र. 12 गुंडावार प्लॉट येथील नागरिकांनी काँग्रेस नगरसेवक सुनील नामोजवार व अनिल पडोळे यांच्याकडे तोंडी तक्रार केली. दोन्ही नगरसेवकांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शहानिशा केली असता तक्रार 100% खरी निघाली. नळाला येणारे पाणी पिवळे होते व त्याला रॉकेल-डिझेलचा दर्प होता.

याबाबत अधिक तपास केला असता गौतम नगर, गुरुनगर, पंचशील वार्ड, गवराला, शिवाजी नगर, हनुमान नगर, विंजासन, मंजुषा ले-आऊट, श्री नगर, विश्वकर्मा नगर यासह इतर अनेक भागातूनही अशुद्ध पाण्याच्या फोनद्वारे तक्रारी येत आहेत.
 
काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी आज मुख्याधिकारी यांची भेट घेऊन संयुक्त निवेदन दिले. "तात्काळ चौकशी करून शुद्ध पाणीपुरवठा करा, नाहीतर तीव्र आंदोलन करू" असा इशारा देण्यात आला.

सुनील नामोजवार यांचा घणाघात:

"अशुद्ध पाणीपुरवठा ही अत्यंत गंभीर बाब आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न आहे. पण '24 तास शुद्ध पाणी देऊ' म्हणणारे सत्तारूढ पदाधिकारी सहली करण्यात गुंग आहेत. जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे," असा आरोप माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी केला.

काँग्रेस गटनेत्या सौ. सरिता सूर, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेविका सौ. कल्पना भुसारी, वंचितच्या नगरसेविका सौ. उर्विला साव, नगरसेविका सौ. उषा जाधव, सौ. पल्लवी तामगडे, नगरसेवक प्रथम गेडाम व इतर उपस्थित होते.

पाण्यात रॉकेल-डिझेल कसे? जलशुद्धीकरण केंद्रात घोळ आहे की पाईपलाईन फुटून गटाराचे पाणी मिसळतेय?, आरोग्य विभाग झोपला आहे का?8-10 दिवस नागरिक विषारी पाणी पित आहेत, एकही पथक तपासायला गेले नाही?,सहली महत्त्वाच्या की जनता? सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या बाटलीतले पिवळे पाणी दाखवायची वेळ आली आहे असा संतप्त रोष नागरिकांतून होत आहे.

------------------------------------------------
 सावधान विषारी पाणी:

 भद्रावतीकरांनो, नळाचे पाणी पिण्याआधी 100 वेळा विचार करा! नळाला पिवळे पाणी + रॉकेल-डिझेलचा वास. गुंडावार प्लॉट, गौतम नगर, शिवाजी नगरसह अर्धे शहर बाधित. 8 दिवसांपासून 'विष' पुरवठा सुरू. मुख्याधिकाऱ्यांना अल्टिमेटम. '24 तास शुद्ध पाणी'वाले सहलीवर! लहान मुलांना, वृद्धांना जपून

--------------------------------------------------
नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांचेकडून प्राप्त माहिती

वरील तक्रारीची माहिती नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांना याबाबत फोनद्वारे संपर्क केला असता यांनी पाणी शुध्दीकरणा  करीता लागणारा ऑलम कमी प्रमाणात होत असल्यामूळे चार- पाच दिवसापासून नळाला अशुध्द पाणी पुरवठात आहे पण आज पासुन पावडर टाकुन नळाला शुध्द पाणी येईल असे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या