Ticker

6/recent/ticker-posts

केंद्रात आणि राज्यात OBC आमदारांची संख्या मोठी... तरी समाजावर अन्याय का?

खासदार आमदार फक्त स्वतःच्या विकासासाठी आहेत काय? ओबीसी क्रांती मोर्चाचा संतप्त सवाल...मिन्सी गावात जाऊन जनगणना विषयी केली जनजागृती


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा:-केंद्रात आणि राज्यात ओबीसी समाजाला निर्णायक मतदार म्हणून पाहिले जाते.लोकसभेत आणि विधानसभेतही मोठ्या प्रमाणावर समाजातील खासदार आणि आमदार निवडून येतात.मात्र आजही आरक्षण,शिक्षण,रोजगार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्वासाठी ओबीसी समाजाला आंदोलन करावे लागत असून असा संतप्त सवाल ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे तर जर लोकसभेत आणि विधानसभेत एवढे खासदार आमदार आहेत तरी सुद्धा ओबीसी समाजावर अन्याय अजूनही का होत आहे ओबीसी क्रांती मोर्चा आणि अनेक ओबीसी बांधव संघटना आक्रमक होत असून अनेक बैठका आणि आंदोलने सुरू आहेत. मात्र तरी सुद्धा समाजातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की,निवडणुकीवेळी OBC समाजाची मतं घेतली जातात मात्र निवडून आल्यानंतर समाजाच्या मूलभूत प्रश्नावर अनेक लोकप्रतिनिधी शांत राहतात.विशेष म्हणजे OBC आरक्षणाचा मुद्दा जातनिहाय जनगणना, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या विषयांवर अजूनही स्पष्ट आणि आक्रमक भूमिका दिसत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर उघडपणे प्रश्न उपस्थित केला आहे की, "हे आमदार खासदार समाजाच्या हक्कासाठी लढत आहेत की फक्त स्वतःचा राजकीय आणि आर्थिक विकास करत आहेत?" याच पार्श्वभूमीवर आज मिन्सी येथे ओबीसी क्रांती मोर्चा संघटना ही गावागावात जाऊन जनजागृती मोहीम राबत आहे.
OBC समाजातील वाढता असंतोष येत्या काळात मोठया राजकिय आंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे दिसत आहेत.तर केंद्रात आणि राज्यात ओबीसीचे आमदार खासदार निवडून जात असले तरी ओबीसी समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असून स्वतःचा विकास करीत असतात त्यामुळे आमदार आणि खासदार निवडणूक उमेदवार म्हणून उभे असतात तेव्हा संपत्तीच्या विवरण दिला जातो मात्र त्याच पाच वर्षांमध्ये आमदार खासदारांकडे एवढी संपत्ती वाढते ती कशी काय वाळते याची सुद्धा चौकशी आता झाली पाहिजे अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या